तरुण भारत

मेक्सिकोमध्ये 12,153 नवे कोरोनाबाधित; 1,707 मृत्यू

ऑनलाईन टीम / मेक्सिको सिटी : 


मेक्सिकोमध्ये बुधवारी 12 हजार 153 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 1 हजार 707 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशात आतापर्यंत 18 लाख 86 हजार 245 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 1 लाख 61 हजार 240 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. 

Advertisements


मेक्सिकोत 18.86 लाख रुग्णांपैकी 14 लाख 50 हजार 237 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 2 लाख 74 हजार 768 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामधील 5,692 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. 


कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत मेक्सिक जगात बाराव्या क्रमांकावर आहे. तर कोरोनाबळींच्या संख्येत या देशाचा चौथा क्रमांक लागतो. येथे आतापर्यंत 47 लाख 62 हजार 394 नमुन्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.

Related Stories

जगातील सर्वात महागडी कार

Patil_p

रुग्णसंख्येप्रकरणी रशिया तिसऱया क्रमांकावर

Patil_p

ब्राझीलमधील कोरोनाबळींची संख्या 80 हजारांवर

datta jadhav

रोममधील विख्यात रुग्णालयानं जारी केला ओमिक्रॉन विषाणूचा पहिला फोटो

Abhijeet Shinde

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहिद खकान अब्बासी यांना कोरोनाची लागण

Rohan_P

सायबेरियात सापडली 28 हजार वर्षे जुनी सिंहिण

Patil_p
error: Content is protected !!