तरुण भारत

बांबू लागवड मार्गदर्शनासाठी पाशा पटेल, संजीव करपे येणार सांगलीत

सांगली / प्रतिनिधी

कृष्णाकाठावर बांबू लागवडीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी राज्य कृषीमुल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल आणि बांबूतज्ञ संजीव कर्पे येत्या रविवारी दि. ७ रोजी सांगलीत येणार आहेत. मिरजेतील ऑक्सिजन पार्कमध्ये ते रविवारी सकाळी अकरा वाजता ‘माझी माय कृष्णा’ समुहामधील कार्यकर्ते, कृष्णाकाठावरील गावातील पदाधिकारी तसेच गावकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

Advertisements

महापुरामुळे कृष्णा आणि वारणा नदीच्या काठाचे मोठे नुकसान झाले आहे. पुरामुळे होणारी काठाची धूप रोखण्यासाठी सांगलीकरांनी कृष्णा नदीकाठावरील ३८ गावांमध्ये बांबू लागवडीबाबत उपक्रम सुरू आहे. या उपक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांना मोफत बांबू रोपे दिली जाणार आहेत. या मोहिमेचा भाग म्हणून शेतकऱ्यांना बांबू लागवडीचे महत्व पटवून देण्यासाठी पाशा पटेल आणि संजीव कर्पे सांगलीत येत आहेत. संजीव कर्पे यांची कुडाळला बांबू ट्रीटमेंट व बांबूच्या वस्तूची फॅक्टरी आहे. त्याबद्दल त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आहेत. मिरजेतील म्हैशाळकर शिंदे मार्गावरील ऑक्सिजन पार्कमध्ये रविवारी सकाळी ११ वाजता हे मार्गदर्शन शिबिर होणार आहे.

Related Stories

‘स्वाभिमानीची’ १९ वी ऊस परिषद २ नोव्हेंबर रोजी

Abhijeet Shinde

वीज पडून दोघांचा मृत्यू

Patil_p

तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांच्या पालकांनी घाबरु नये- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Abhijeet Shinde

यापुढे कोणावर काहीच बोलणार नाही : मंत्री मुश्रीफ

Abhijeet Shinde

गरिबांना मोफत लशीची केंद्राकडे मागणी : राजेश टोपे

Rohan_P

अनुसूचित जाती जमाती प्रवर्गासाठी वाचनालय सुरू करा : मंत्री सतेज पाटील यांना निवेदन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!