तरुण भारत

बांगलादेशचा 430 धावांचा डोंगर, मिराजचे शतक

वृत्तसंस्था / चित्तगाँग

मेहदी हसन मिराजच्या शानदार शतकाच्या जोरावर येथे सुरू असलेल्या विंडीज विरूद्धच्या पहिल्या कसोटीत यजमान बांगलादेशने पहिल्या डावात 430 धावांचा डोंगर उभा केला. दिवसअखेर विंडीजने 2 बाद 75 धावा जमविल्या होत्या.

Advertisements

बांगलादेशने 5 बाद 242 या धावसंख्येवरून गुरूवारी खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांच्या उर्वरित पाच फलंदाजांनी खेळाच्या दोन सत्रामध्ये 188 धावांची भर घातली. बांगलादेशचा पहिला डाव 150.2 षटकांत 430 धावांवर आटोपला. दुसऱया दिवशीच्या खेळाला प्रारंभ झाल्यानंतर विंडीजच्या वारिकनने बांगलादेशच्या लिटन दासला तिसऱया षटकांत 38 धावांवर त्रिफळाचीत केले. दरम्यान शकीब अल हसन आणि मेहदी हसन मिराज यांनी सातव्या गडय़ासाठी 67 धावांची भागिदारी केली.

कॉर्नवॉलने शकीब अल हसनला ब्ा्रsथवेटकवी झेलबाद केले. शकीब अल हसनने 150 चेंडूत 5 चौकारांसह 68 धावा जमविल्या. 24 धावांवर असताना विंडीजकडून जीवदान मिळालेल्या मेहदी हसन मिराजने कसोटीतील आपले पहिले शतक झळकविले. त्याने 168 चेंडूत 103 धावा जमविल्या.

संक्षिप्त धावफलक

बांगलादेश प.डाव 150.2 षटकांत सर्वबाद 430, (मेहदी हसन मिराज 103, शकीब अल हसन 68, दास 38, एस. इस्लाम 59, मोमिनूल हक 25, मुश्फिकुर रहीम 38, नझमूल हुसेन 25, टी. इस्लाम 18, नईम हसन 24, वारिकन 4-133, कॉर्नवॉल 2-114, रोश, गॅब्रियल, बॉनेर प्रत्येकी एक बळी), विंडीज प. डाव- 29 षटकांत 2 बाद 75 (के.ब्रेथवेट खेळत आहे 49, बॉनेर खेळत आहे 17, कँपबेल 3, मोसली 2, मुस्तफिजुर रेहमान 2-18).

Related Stories

बेल्जियमविरुद्धच्या लढतीसाठी मनप्रीत सिंगकडे नेतृत्व

Patil_p

कोव्हिड बदली खेळाडू, लाळबंदीवर आयसीसीचे शिक्कामोर्तब

Patil_p

ऑस्टेलियन फुटबॉलपटू मर्सेला इस्ट बंगालशी करारबद्ध

Patil_p

पाकिस्तानचा फलंदाज अबिद अलीवर अँजिओप्लॅस्टी

Patil_p

आगामी आयएसएल स्पर्धा बंदिस्त स्टेडियममध्ये होणार

Patil_p

सायनाचे आव्हान संपुष्टात, कृष्णा-विष्णू अंतिम फेरीत

Patil_p
error: Content is protected !!