तरुण भारत

पंतप्रधान मोदींच्या पुतणीलाच भाजपने नाकारले तिकीट

ऑनलाईन टीम / अहमदाबाद : 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुतणी सोनल मोदी यांना अहमदाबाद महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने तिकीट नाकारले आहे. नव्या नियमांमुळे पंतप्रधान मोदींच्या पुतणीचे नाव उमेदवारांच्या यादीत नसल्याचे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे.

Advertisements

सोनल मोदी या पंतप्रधान मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी यांची मुलगी आहे. प्रल्हाद मोदी शहरात रेशन दुकाने चालवतात आणि गुजरात फेअर रेट शॉप असोसिएशनचे ते अध्यक्षही आहेत. गुजरात भाजपने आगामी निवडणुकीत पक्षनेत्यांच्या नातेवाईकांना तिकीट दिले जाणार नाही, असे नुकतेच जाहीर केले होते. या नियमांमुळे भाजपने सोनल यांना तिकीट नाकारले.

आपण पंतप्रधानांची पुतणी म्हणून नव्हे तर भाजप कार्यकर्ता म्हणून तिकीट मागितल्याचा दावा सोनल मोदी यांनी केला आहे.

Related Stories

युपी : केंद्रीय राज्यमंत्री संजीव बालियान यांच्या भावाचे कोरोनाने निधन

Rohan_P

भारताचा जवळचा मित्र रशियानं तालिबान्यांचं केलं कौतुक

Abhijeet Shinde

पेट्रोल-डिझेल दराचा भडका

Patil_p

3 भारतीय छायाचित्रकारांना पुलित्झर

Patil_p

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ; पाहा तुमच्या शहरातील दर

Rohan_P

घरी परतणाऱ्या मजुरांना काँग्रेसकडून मदतीचा ‘हात’

Rohan_P
error: Content is protected !!