तरुण भारत

मेक्सिकोत कोरोनाबळींची संख्या 1.62 लाखांवर

ऑनलाईन टीम / मेक्सिको सिटी : 

मेक्सिकोत आतापर्यंत 18 लाख 99 हजार 820 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 1 लाख 62 हजार 922 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. 

Advertisements

गुरुवारी या देशात 12 हजार 153 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 1707 जणांचा मृत्यू झाला.18.99 लाख रुग्णांपैकी 14 लाख 61 हजार 011 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 2 लाख 75 हजार 887 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामधील 5692 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. 

कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत मेक्सिको जगात तेराव्या क्रमांकावर आहे. तर कोरोनाबळींच्या संख्येत या देशाचा चौथा क्रमांक लागतो. येथे आतापर्यंत 48 लाख 05 हजार 195 नमुन्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.

Related Stories

तालिबानकडून सरकार स्थापनेची घोषणा

datta jadhav

कोरोनाहून अधिक घातक विषाणू येण्याचा धोका

Patil_p

युरोपमधील सर्वात मोठय़ा मेळय़ास प्रारंभ

Patil_p

फ्रान्सच्या शेतकऱयांना मेणबत्तीचा आधार

Amit Kulkarni

अमेरिकेच्या इराकमधील दुतावासाजवळ रॉकेट हल्ला

prashant_c

मालदीवचे माजी अध्यक्ष कोरोनाबाधित

Patil_p
error: Content is protected !!