तरुण भारत

कोल्हापूर : इचलकरंजीच्या गुंड लाखे गँगमधील फरारी गुन्हेगाराला अटक

सुमारे तीन वर्षे होता फरारी : गुन्हेगार हरिकिशन पुरोहित असे अटक केलेल्याचे नाव

प्रतिनिधी / इचलकरंजी

Advertisements

मोकातंर्गत कारवाई केलेल्या इचलकरंजी येथील गुंड श्याम लाखे याच्या गँग मधील सुमारे तीन वर्षे फरारी असलेल्या गुंडास पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. हरिकिशन नंदकिशोर पुरोहित (वय ३ ९, रा. राधाकृष्ण टॉकीज समोर, वृंदावन बिल्डींग इचलकरंजी) असे त्याचे नाव आहे. त्याला येथील न्यायालयात दुपारी हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे त्याची रवानगी कळंबा कारागृहात करण्यात आली आहे. ही कारवाई कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी दिली.

पोलीस निरीक्षक सावंत म्हणाले, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी जिल्ह्यातील मोका अंतर्गत गुन्ह्यातील आणि अन्य गुन्ह्यामधील फरारी असलेल्या संशयीत आरोपीचा शोध घेण्याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस अधिकाऱ्याना आदेश दिला होता. याच दरम्यान महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदयातील (मोका) फरारी गुंड हरिकिशन पुरोहित हातकणंगले (जि. कोल्हापूर) येथील लक्ष्मी इंडस्ट्रीज येथे येणार असल्याची माहिती बातमीदाराकडून समजली. त्यावरून एक पथक करून त्याला गुरुवारी ( ४ फेब्रुवारी) दुपारी रंगेहाथ पकडले. तो सुमारे ३ वर्षे फरारी होता.

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले, पोलीस उपनिरीक्षक विनायक सपाटे, कॉन्स्टेबल असीफ कलायगर सुरेश पाटील, विनोद कांबळे, प्रदिप नाकिल व अमर वासुदेव यांनी केली.

Related Stories

विज बिल माफीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने रास्ता रोको

triratna

कोल्हापूर : माधवनगरच्या वीरेंद्र पाटीलने दोन वेळा केले ‘प्लाझ्मा दान’

triratna

एफआरपी तातडीने द्यावी अन्यथा १५ ऑक्टोबर पासून उपोषण – स्वाभीमानी शेतकरी संघटना

triratna

गोकुळ’च्या रणधुमाळीत राष्ट्रवादी सत्ताधाऱ्यांसोबत ?

Shankar_P

कोल्हापूर : मलकापूर शिवारात गव्यांचा कळप दाखल

triratna

शहरवासियांना फुकट पाणी देता का?

triratna
error: Content is protected !!