तरुण भारत

पश्चिम महाराष्ट्रातील 12.46 लाख कृषी वीजग्राहकांना वीजबिल कोरे करण्याची संधी

6 हजार 731 कोटींची मिळणार माफी

प्रतिनिधी / कोल्हापूर

राज्याच्या कृषीपंप वीजजोडणी धोरण 2020 अंतर्गत पश्चिम महाराष्ट्रातील प्रामुख्याने कृषिपंपधारकांसह 12 लाख 46 हजार 455 कृषी वीजग्राहकांना वीजबिल कोरे करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या ग्राहकांकडे सद्यस्थितीत 10824 कोटी 56 लाख रुपयांची एकूण थकबाकी आहे. यातील निर्लेखन, व्याज व विलंब आकाराचे एकूण 2 हजार 638 कोटी 51 लाख रुपये महावितरणकडून माफ करण्यात आले आहे. या कृषी ग्राहकांनी उरलेल्या 8 हजार 186 कोटींच्या मूळ थकबाकीपैकी 50 टक्के रकमेचा वर्षभरात भरणा केल्यास थकबाकीची उर्वरित 50 टक्के म्हणजे 4 हजार 93 कोटींची रक्कम माफ करण्यात येणार आहे. सोबतच त्यांचे थकीत वीजबिल देखील कोरे होणार आहे.

कृषिपंपाच्या नवीन वीजजोडण्या तसेच वीजबिलांच्या वसुलीसाठी थकबाकी, व्याज व विलंब आकारात सवलत देणारे स्वतंत्र धोरण ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या पुढाकारातून नुकतेच जाहीर झाले आहे. या धोरणानुसार थकबाकीसह चालू वीजबिलांद्वारे वसुल झालेल्या एकूण रकमेपैकी 33 टक्के रक्कम ग्रामपंचायत क्षेत्रात तर 33 टक्के रक्कम जिल्हास्तरीय क्षेत्रात नवीन उपकेंद्र, वाहिन्यांसह वीज यंत्रणेच्या सक्षमीकरण तसेच विस्तारीकरणासाठी वापरण्यात येणार आहे. कृषिपंप वीजजोडणी धोरण 2020 मध्ये प्रामुख्याने कृषिपंपासह सर्व उच्च व लघुदाब कृषी ग्राहक तसेच उपसा जलसिंचन योजनेतील चालू व कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांचा समावेश करण्यात आला आहे. या ग्राहकांच्या 5 वर्षांपूर्वीच्या थकबाकीवरील व्याज व विलंब आकार 100 टक्के माफ करण्यात आला आहे. तसेच सप्टेंबर 2015 पर्यंतच्या थकबाकीवरील विलंब आकार 100 टक्के माफ करून व्याज हे 18 टक्क्यांऐवजी त्या-त्या वर्षाच्या खेळत्या भांडवलावरील व्याजदरानुसार आकारण्यात येत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात 1 लाख 45 हजार 904 कृषी ग्राहक असून त्यांच्याकडे 477 कोटी 66 लाख रुपयांची एकूण थकबाकी आहे. यातील निर्लेखन, व्याज व विलंब आकाराचे 46 कोटी 93 लाख माफ करण्यात आले आहे. तर उरलेल्या मूळ थकबाकीच्या 430 कोटी 72 लाखांपैकी 50 टक्के रकमेचा वर्षभरात भरणा केल्यास थकबाकीची उर्वरित 50 टक्के म्हणजे 215 कोटी 36 लाखांची रक्कम माफ करण्यात येणार आहे.

कृषी ग्राहकांना वीजबिलांची थकबाकी, माफी व भरावयाची रक्कम आदींचा तपशील महावितरणने https://billcal.mahadiscom.in/agpolicy2020/ या वेबपोर्टलवर मराठी व इंग्रजीमध्ये उपलब्ध करून दिला आहे. केवळ ग्राहक क्रमांक सबमीट केल्यानंतर योजनेमध्ये भरावयाच्या रकमेसह इतर संपूर्ण तपशील उपलब्ध आहे. केवळ ग्राहक क्रमांक सबमीट केल्यानंतर योजनेनुसार सवलत व भरावयाच्या रकमेसह इतर संपूर्ण तपशील उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी नजिकच्या कार्यालयात संपर्क साधावा व वीजबिल थकबाकीमुक्तीच्या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे यांनी केले आहे.

Related Stories

कोल्हापूर : रस्त्याच्या मधोमध लटकतायत झाडाच्या फांद्या, वाहतूक बनली धोक्याची

Abhijeet Shinde

उड्डाणपुलामुळे स्थानिकांसह व्यापाऱ्यांना दिलासा

Abhijeet Shinde

उचगाव येथे डेंग्यूसह चिकनगुनिया सदृष्य आजाराचे थैमान, तातडीने उपाययोजनांची गरज

Abhijeet Shinde

राष्ट्रीय महामार्गावर किणी टोल नाक्या जवळ तीन ते चार फूट पाणी

Abhijeet Shinde

कोल्हापूर महापालिका प्रशासक आणि कर्मचारी संघातील चर्चा फिस्कटली

Abhijeet Shinde

कोल्हापूर : वादळी पावसामुळे गांधीनगर येथे नुकसान

Abhijeet Shinde
error: Content is protected !!