तरुण भारत

बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांना नवीन आयएफसी कोड घ्यावा लागणार

1 मार्च 2021 रोजी बंद होणार कोड  

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

केंद्र सरकारने काही काळाअगोदर देना बँक आणि विजया बँकांचे बँक ऑफ बडोदात विलीनीकरण केले होते. सदरच्या विलीनीकरणानंतर या दोन बँकांचे ग्राहक आता बँक ऑफ बडोदाचे ग्राहक बनले आहेत. यामुळे आता बँक ऑफ बडोदाने सोशल मीडियाच्या आधारे आपल्या ग्राहकांना ई-विजया आणि ई-देना आयएफसी कोड 1 मार्च 2021 रोजी बंद होणार असल्याचे म्हटले आहे. विजया आणि देना बँक शाखांमधून ग्राहकांनी आपला नवा आयएफसी कोड घ्यावा असे सांगितले आहे.

  2020 रोजी विलीनीकरण

सरकारकडून 1 एप्रिल 2020 रोजी देना बँक आणि विजया बँक यांचे बँक ऑफ बडोदामध्ये विलीनीकरण करण्यात आले होते. या विलीनीकरणानंतर बँक ऑफ बडोदा जगातील तिसऱया नंबरची सर्वात मोठी बँक बनली असल्याची नोंद आहे.

घर बसल्या मिळेल कोड

आपल्या 18002581700 टोल फ्री नंबरवर कॉल करु शकता किंवा आपल्या बँकेच्या शाखेत जाऊन प्रत्यक्षही हा कोड घेऊ शकणार असल्याची माहिती आहे.  यासोबतच मेसेज करुनही नवा कोड प्राप्त करु शकता असे सांगितले आहे.

Related Stories

महिंद्रा ऍण्ड महिंद्रा 16 इलेक्ट्रिक वाहने सादर करणार

Patil_p

तेजीचा ‘सप्तसूर’

Omkar B

फ्लिपकार्टकडून क्लीअरट्रीपचे अधिग्रहण

Amit Kulkarni

आर्सेलर-मित्तलचा ओडीसात कारखाना

Patil_p

‘वाडीलाल’चे 800 कोटींचे विक्रीचे उद्दिष्ट

Patil_p

रामको सिमेंट्सचा अंतरिम लाभांश घोषित

Patil_p
error: Content is protected !!