तरुण भारत

रियलमीचा ‘एक्स 7, एक्स 7 प्रो’ 5-जी स्मार्टफोन सादर

नवी दिल्ली 

 चिनी कंपनी रियलमीने भारतामध्ये आपले दोन स्मार्टफोन सादर केले आहेत, यामध्ये रियलमी-एक्स 7 आणि एक्स 7 प्रो या मॉडेलचा समावेश आहे. दोन्ही फोनसाठी  5जी सपोर्ट आहे. फोटोसाठी एक्स 7 प्रोमध्ये चार आणि एक्स 7 मध्ये तीन रियर कॅमेऱयांची सुविधा असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

रियलमी एक्स 7 प्रोमध्ये एकत्रितपणे 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजची सोय आहे. या मॉडेलची किमत 29,999 रुपये आहे. फोन फँटेसी आणि मिस्टिक ब्लॅक रंगात उपलब्ध होणार आहे. 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज रियलमी एक्स 7 5-जीची किमत 19,999 रुपये असून 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज फोनची किमत 21,999 रुपये राहणार असल्याची माहिती आहे.

विक्री लवकरच

रियलमी एक्स-7 स्मार्टफोन 10 फेब्रुवारीपासून फ्लिपकार्ट, रियलमी डॉट कॉम आणि ऑफलाईन स्टोअरवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. तसेच रियमी एक्स 7 हा फोन 12 फेबुवारीपासून याच प्लॅटफॉर्मवर खरेदी करता येणार आहे.

Related Stories

लाव्हाची स्मार्टफोन बाजारात दमदार एंट्री

Patil_p

ऍमेझॉनवर सॅमसंगचा सर्वात महाग स्मार्टफोन

tarunbharat

रियलमी-6 ची पहिली विक्री आजपासून सुरू

tarunbharat

जुलैत गॅलेक्सीचे फोल्डेबल स्मार्टफोन्स

Patil_p

वनप्लस8-8प्रो स्मार्टफोन्स सादर

Patil_p

अत्याधुनिक अंतराळ पोशाख

tarunbharat
error: Content is protected !!