तरुण भारत

पुत्र व्हावा ऐसा ‘गुंडा’…

बिहारच्या वैशाली जिल्हय़ातील मंगलम नामक युवकाने लोकप्रिय ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात भाग घेऊन 50 लाख रूपयांची कमाई केली आहे. वरवर पाहता या वृत्तात काही विशेष आहे असे वाटत नाही. कारण या कार्यक्रमात अनेकांनी असा प्रकारे यश मिळविले आहे. पण मंगलम याची कहाणी काही निराळी आहे. आपल्या पित्याचे अपशय धवून काढत त्याने ही कामगिरी केली.

मंगलम हा दिलीप कुमार चौधरी यांचा पुत्र. काही वर्षांपूर्वी दिलीप कुमार चौधरी स्वतः आपल्या भाग्याची परीक्षा घेण्यासाठी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. पहिले काही अडथळे पार करून ते अभिताभ बच्चन यांच्या समोर ‘हॉट सीट’वर बसण्यात यशस्वी ठरले. तथापि, त्यांना रक्कम जिंकण्यात मात्र यश आले नाही.

यामुळे मंगलमचा निर्धार जागृत झाला. त्याने या कार्यक्रमात यश मिळविण्याचा निश्चय केला. त्याप्रमाणे तयारी सुरू केली. अखेर त्यालाही प्राथमिक पायऱया ओलांडल्यानंतर हॉट सीटवर बसण्याची संधी मिळाली. त्याने चांगलीच मजल मारली. 50 लाख रूपयांच्या टप्प्यापर्यंत पोहचला. 14 प्रश्नांची उत्तरे त्याने अचूक दिली. पंधराव्या प्रश्नाचे उत्तर त्याला देता आले नाही. त्यामुळे 1 कोटी रूपयांऐवजी 50 लाख रूपयांवर समाधान मानावे लागले. मात्र, हे यशही लहानसहान नसल्याने तो आता कौतुकाचा विषय झाला आहे. विशेषतः आपल्या पित्याचे अपयश धुवून काढत त्याने मिळविलेले हे यश ‘पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा‘ अशा प्रकारचे आहे. (येथे गुंडा हा शब्द चांगल्या अर्थाने आहे).

मंगलम आणि त्याचे कुटुंब वैशाली जिल्हय़ाच्या देसरी प्रखंडमधील चांदपुरा बाजार या गावातील आहे. या गावाची मान त्याने उंचावली असल्याने तो या गावात आणि आसपासच्या वस्त्यांमध्ये सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.

Related Stories

खासगी’त 250 रुपयात लस

Amit Kulkarni

दिल्लीत 871 नवीन कोरोनाबाधित ; 18 मृत्यू

pradnya p

एमबीबीएसमध्ये कोविड व्यवस्थापन अभ्यासक्रम

Patil_p

कच्छमध्ये सलग तिसऱया भूकंप

Patil_p

27 जुलैपासून नियमित सुनावणी

Patil_p

भारतात 53,601 नवे कोरोना रुग्ण

datta jadhav
error: Content is protected !!