तरुण भारत

राज्यसभेच्या 3 जागांसाठी 1 मार्चला पोटनिवडणूक

नवी दिल्ली

 राज्यसभेच्या तीन रिक्त जागांसाठी 1 मार्चला पोटनिवडणूक होणार आहे. काँग्रेसचे ज्ये÷ नेते अहमद पटेल यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या एका जागेचाही त्यामध्ये समावेश आहे. राज्यसभेवर गुजरातमधून निवडून द्यावयाच्या दोन आणि आसाममधून निवडून द्यावयाची एक अशा तीन जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. त्यासाठीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. पोटनिवडणुकीसाठीची अधिसूचना 11 फेब्रुवारीला जारी होईल. मतदानाच्या दिवशी सायंकाळी मतमोजणी करण्यात येईल.

Advertisements

पटेल आणि भाजपचे खासदार अभय भारद्वाज यांच्या निधनामुळे गुजरातमधून निवडून द्यावयाच्या राज्यसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या. पटेल आणि भारद्वाज यांच्या राज्यसभा सदस्यत्वाची मुदत अनुक्रमे ऑगस्ट 2023 आणि जून 2026 मध्ये संपुष्टात येणार होती. बोडो पीपल्स प्रंटचे नेते बिस्वजीत दैमारी यांनी मागील वषी नोव्हेंबरमध्ये राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे आसाममधील एक जागा रिक्त झाली आहे. दैमारी यांच्या सदस्यत्वाची मुदत एप्रिल 2026 पर्यंत होती.

Related Stories

ओसीआय कार्ड धारकांसंबंधी केंद्र कठोर

Patil_p

आंध्रात माजी मंत्र्याला अपहरणप्रकरणी अटक

Patil_p

रंगीत टीव्हींच्या आयातीवर निर्बंध

Patil_p

देशातील रुग्णसंख्येचा आलेख उंचावतोय

datta jadhav

‘गौतम गंभीर फाऊंडेशन’ औषधांच्या अवैध साठेबाजी प्रकरणात दोषी : ड्रग्ज कंट्रोलर

Rohan_P

‘नोटा’संबंधी केंद्र सरकारसह निवडणूक आयोगाला नोटीस

Patil_p
error: Content is protected !!