तरुण भारत

‘त्या’ परीक्षार्थींना आणखी एक संधी

युपीएससीसाठी मागील वर्षी शेवटचा प्रयत्न करणाऱयांना लाभ- केंद्र सरकारची सकारात्मक भूमिका

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

कोरोना संसर्गामुळे गेल्यावषी युपीएससी परीक्षा देण्यात अनेक इच्छुकांना अडथळय़ांचा सामना करावा लागला होता. तसेच काहींना परीक्षाही देता न आल्याने अंतिम संधीला मुकावे लागले होते. त्यामुळे मागील वर्षी वयोमर्यादेनुसार अखेरची संधी असलेल्यांना आणखी एक अतिरिक्त संधी देण्याबाबत केंद्र सरकारने सकारात्मकता दर्शवली आहे. यासंबंधी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर शुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यान केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्राद्वारे भूमिका स्पष्ट केली आहे. सदर याचिकेवर ए. एम. खानविलकर यांच्या खंठपीठासमोर सुनावणी झाली.

गेल्यावषी ज्या विद्यार्थ्यांनी आपला युपीएससीचा शेवटचा प्रयत्न केला होता, त्यांना यावषी आणखी एक संधी देण्यास सरकार अनुकुल आहे. याबद्दलची केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट झाल्यामुळे आता संबंधित विद्यार्थ्यांना 2021 साली आणखी एक संधी घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याआधी, 25 जानेवारीला केंद्र सरकारने न्यायालयात प्रतिज्ञापत्रक सादर करताना अशा विद्यार्थ्यांना आणखी संधी मिळणार नाही, असे सांगितले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने निर्णयाबाबत पुनर्विचार करून मत मांडण्याचे निर्देश दिले होते. आता नवीन प्रतिज्ञापत्रक दाखल करताना केंद्र सरकारने गेल्या वषी शेवटचा प्रयत्न करणाऱया विद्यार्थ्यांना आणखी एक संधी मिळावी यासाठी अनुकुलता दर्शवली आहे.

कोरोनाच्या संकटामुळे शैक्षणिक क्षेत्रावर मोठा परिणाम झाला. शैक्षणिक परीक्षांबरोबरच केंद्रीय आणि राज्य लोकसेवा आयोगांकडून घेणाऱया विविध स्पर्धा परीक्षांनाही याचा फटका बसला होता. परीक्षा देता न आल्याने अनेकांच्या अधिकारी होण्याच्या आशा कायमच्या मावळल्या होत्या. वयाच्या अटीमुळे अनेकजण परीक्षा देण्याच्या स्पर्धेतून बाद झाले होते. मात्र, आता कोरोनामुळे संधी गेलेल्या आणि वयाच्या अटीतून बाद झालेल्यांना केंद्र सरकारने दिलासा दिला आहे.

Related Stories

महाराष्ट्रात 8 जुलैपासून राहण्याची व्यवस्था असणारी हॉटेल्स उघडणार

pradnya p

भारतात एक लाखांहून अधिक कोरोनाबळी

datta jadhav

पंतप्रधानांची कर्नाटक, पंजाब, बिहार आणि उत्तराखंडमधील मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा

Shankar_P

दिलासादायक : महाराष्ट्रात दिवसभरात 6,748 रुग्ण कोरोनामुक्त!

pradnya p

शरद पवारांचा उत्तर महाराष्ट्राचा दौरा रद्द ; ‘हे’ आहे कारण…

pradnya p

मध्यप्रदेश : शाजापूरमध्ये विहिरीची भिंत पडून चार मजुरांचा मृत्यू

pradnya p
error: Content is protected !!