तरुण भारत

‘योद्धय़ां’ना 13 रोजी लसीचा दुसरा डोस

केंद्र सरकारने केली तारीख जाहीर

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

भारतात 16 जानेवारीपासून देशव्यापी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱयांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. आता त्यांना दुसरा डोस 13 फेब्रुवारीपासून दिला जाणार असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कोरोना प्रतिबंधक देशव्यापी लसीकरण मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱयांना केवळ पहिलाच डोस देण्यात आला होता. आता 28 दिवसांनंतर त्यांना दुसरा डोस दिला जाईल. त्यानंतर ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पुढे जाईल. देशात दररोज लसीकरण होणाऱयांच्या संख्येत वाढ होत आहे. मागील 19 दिवसांमध्ये 45 लाख जणांना कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस देण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.

Related Stories

वाहतूक नियंत्रणासाठी तामिळनाडू-आंध्रप्रदेशच्या सीमेवर भिंत

prashant_c

दिल्लीत दोन महिन्यांनी उद्याने खुली

Patil_p

सहकाराद्वारे दाखवू विकासाचा रोडमॅप

Patil_p

भाजपकडून पश्चिम बंगाल विधानसभेची तयारी; शाह, नड्डा करणार दर महिन्याला दौरा

datta jadhav

पाकसोबतचा व्यापार पुन्हा सुरू व्हावा

Patil_p

पुदुचेरी : काँग्रेस निवडणूक समितीच्या बैठकीत नेत्यांमध्ये झटापट

datta jadhav
error: Content is protected !!