तरुण भारत

अव्वलमानांकित ज्योकोव्हिचची सलामीची लढत चार्डीशी

वृत्तसंस्था/ मेलबोर्न

2021 टेनिस हंगामातील पहिल्या ऑस्ट्रेलियन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेला 8 फेब्रुवारीपासून येथे प्रारंभ होत आहे. या स्पर्धेचा ड्रॉ शुक्रवारी जाहीर केला गेला असून त्यानुसार पुरुष एकेरीत सर्बियाचा टॉप सीडेड नोव्हॅक ज्योकोव्हिकचा सलामीचा सामना फ्रान्सच्या जेरेमी चार्डीशी होणार आहे. 2009 पासून टेनिस क्षेत्रातील पहिले जेतेपद मिळविण्यासाठी झगडत असलेला स्पेनचा राफेल नदाल याचा सलामीचा सामना सर्बियाच्या लेसीओ डिजेरीशी होईल. महिलांच्या एकेरीत या स्पर्धेतील विद्यमान विजेती सोफिया केनिनची सलामीची लढत वाईल्ड कार्डधारक मॅडिसन इंग्लेसबरोबर होणार आहे.

Advertisements

पुरुष एकेरीच्या विभागात सर्बियाचा अव्वलमानांकित ज्योकोव्हिचने गेल्या वषी या स्पर्धेत अजिंक्मयपद पटकावताना ऑस्ट्रियाच्या डॉम्निक थियेमचा अंतिम फेरीत पराभव केला होता. ज्योकोव्हिचने आतापर्यंत विक्रमी आठ वेळा ऑस्ट्रेलियन ग्रॅण्डस्लॅम स्पर्धा जिंकली आहे. यावेळी ऑस्ट्रियाच्या तृतीय मानांकित थियेमचा सलामीचा सामना कझाकस्तानच्या कुकूशिखिनशी होणार आहे. स्पेनचा माजी टॉप सीडेड राफेल नदाल अलीकडच्या काही कालावधीत वारंवार दुखापतीने चांगलाच त्रासला होता. 2009 पासून त्याला एकही महत्त्वाची स्पर्धा जिंकता आलेली नाही. मात्र, नदालने स्वीसचा अनुभवी टेनिसपटू रॉजर फेडररच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. नदाल आणि फेडरर या दोन्ही अनुभवी टेनिसपटूंनी आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत आतापर्यंत समान 20 ग्रॅण्डस्लॅम अजिंक्मयपदे मिळविण्याचा पराक्रम केला आहे. गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे रॉजर फेडरर ऑस्ट्रेलियन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेत यावषी सहभागी होणार नाही.

ऑस्ट्रेलियाची टॉप सीडेड महिला टेनिसपटू बार्टी तसेच अमेरिकेची माजी टॉप सीडेड आणि अनुभवी सेरेना विल्यम्स, जपानची नाओमी ओसाका, स्पेनची कॅरोलिनी गार्सिया, रुमानियाची सीमोना हॅलेप यांच्यात जेतेपदासाठी यावेळी चुरस राहील. 2019 साली या स्पर्धेत जपानच्या नाओमी ओसाकाने विजेतेपद मिळविले होते. सेरेना विल्यम्सने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत आतापर्यंत 23 ग्रॅण्डस्लॅम अजिंक्मयपदे मिळविली आहेत. तिचा यावेळी पहिल्या फेरीतील सामना लॉरा सिगमंडशी होणार आहे. हॅलेपचा सलामीचा सामना कॅब्रेराशी तर स्वीटोलिनाचा सामना बोझकोव्हाशी होणार आहे. रशियाचा डॅनियल मेदव्हेदेव याला गेल्या दोन वर्षामध्ये या स्पर्धेत चौथ्या फेरीत हार पत्करावी लागली होती. त्याचा सलामीचा सामना कॅनडाच्या पोस्पीसिलशी होणार आहे.

Related Stories

विंडीज क्रिकेटपटूंना सध्या निम्मे वेतन देण्याचा निर्णय

Patil_p

वाडाच्या शास्रीय संशोधनासाठी भारताकडून 10 लाख डॉलर्स

Patil_p

5 नोव्हेंबरचे भारतीय क्रिकेटशी अनोखे नाते!

Patil_p

विंडीजला 154 धावांची आघाडी, कॉर्नवलचे 5 बळी

Patil_p

पीव्ही सिंधू ऍथलिट्स कमिशनची निवडणूक लढवणार

Patil_p

स्टेडियम तर रिकामे…मग तो आवाज येतो कुठून?

Patil_p
error: Content is protected !!