तरुण भारत

गवत पेटवताना भाजून वृध्देचा जागीच मृत्यू

काळोशीतील दुर्देवी घटना

प्रतिनिधी/ सातारा

Advertisements

उन्हाळय़ाचे वेध लागल्यानंतर ग्रामीण भागात डोंगर, शिवारातील गवत जाळून टाकण्याची पध्दत आजही सुरु आहे. काळोशीत देखील एक 80 वर्षाची वृध्दा शिवारातील गवत पेटवण्यास गेली. मात्र, वाऱयामुळे जाळ पेटत गेला आणि चहूबाजुने लागलेल्या आगीने वृध्देला कवेत घेतले. आजबाजुला कोणीही नसल्याने या घटनेत संपूर्णपणे भाजून या वृध्देचा आगीने बळी घेतल्याची दुर्देवी घटना घडली.

या घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी, दि. 5 रोजी सकाळी 9 ते 10 वाजण्याच्या दरम्यान काळोशी (ता. सातारा) येथील सजाबाई नामदेव निकम (वय 80) या वृध्द महिला शेतात गेल्या होत्या. गवळी नावाच्या शिवाराच्या पुढे असलेल्या मांगीर नावाच्या शिवारात त्यांच्या शेतातील गवत त्यांनी पेटवले.

मात्र, वाऱयामुळे गवत पेटत गेले आणि चहूबाजुला आग पसरली. या आगीत वृध्द सजाबाई यांच्या अंगावरील साडीने पेट घेतला. एकतर 80 वर्षांचे वय, काठी टेकत काहीतरी काम करावे म्हणून गेलेल्या सजाबाई यांच्या साडीने पेट घेतला आणि चहूबाजुने लागलेल्या आगीच्या भक्ष्यस्थानी त्या पडल्या. ही घटना घडली तेव्हा शिवारात आजुबाजूला कोणीही नव्हते. त्यामुळे त्यांच्या आर्त हाक देखील कोणाला ऐकू जाण्याची शक्यताच नव्हती. खूप वेळ झाल्याने सजाबाई घरी न आल्याने नातेवाईक त्यांना बोलावून आणण्यासाठी गेले असताना मग ही घटना समोर आली आणि निकम कुटुंबियांनी मग एकच आकांत केला. याबाबतची खबर त्यांचा मुलगा वैभव आबाजी निकम वय 24 रा. काळोशी यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार दीपक बर्गे करत आहेत.

Related Stories

रत्नागिरी : सरपंच पदाची आरक्षण सोडत 15 डिसेंबर रोजी

Abhijeet Shinde

”भाजपचे लोक एक दिवस मराठी माणसाला मुंबईत परप्रांतीय ठरवतील”

Abhijeet Shinde

सातारा : त्रिपुटी परिसरात कोरोना रुग्ण सापडल्याने धास्ती वाढली

Abhijeet Shinde

पाच जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह; नऊ अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल

Abhijeet Shinde

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोडांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – चित्रा वाघ

Abhijeet Shinde

शरद पवारांची विचारपूस करण्यासाठी नारायण राणे ब्रीच कँडीत

Abhijeet Shinde
error: Content is protected !!