तरुण भारत

साकोर्डा सरपंचपदी दीनानाथ गावकर बिनविरोध

प्रतिनिधी / धारबांदोडा

साकोर्डा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दीनानाथ गावकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सरपंच जितेंद्र नाईक यांनी आपल्या सरपंचपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त होते.

काल शुक्रवारी पंचायत सभागृहात झालेल्या निवडणूकीत दीनानाथ गावकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली आहे. सरपंचपदाची निवड झाल्यानंतर आपण सर्वाना विश्वासात घेऊन बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांच्या मदतीने साकोर्डा पंचायतीच्या विकास करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी माजी सरपंच जितेंद्र नाईक, उपसरपंच नेहा कालेकर, पंचसदस्य उज्वला गावकर, शिरिष देसाई, गौतम सावंत, विन्दा सावंत उपस्थित होते. निर्वाचन अधिकारी म्हणून धारबांदोडा गटविकास कार्यालयाचे अधिकारी हेमंत गावस उपस्थित होते. त्याना सचिव अमोल तेंडूलकर यांनी सहाय्य केले.

Related Stories

गोमंतकीय लोकांशी खोटे बोलणे बंद करा

Patil_p

संपूर्ण ‘आयएसएल’ रंगणार गोव्यात

Patil_p

आयएमबी अध्यक्षपदी दशरथ परब

Amit Kulkarni

म्हापसा निरीक्षक नरसिंह राटवळ यांचा पालिकेतर्फे गौरव

Omkar B

…अखेर त्याने संपविले जीवन

Patil_p

गुळेली आयआयटी प्रकल्पाबाबत जनमत जाणून घेणार

Omkar B
error: Content is protected !!