तरुण भारत

ज्योती इकॉनॉमिक्स ऍन्ड कॉमर्स फोरमतर्फे व्याख्यान

प्रतिनिधी / बेळगाव

द.म.शि. मंडळाच्या ‘ज्योती इकॉनॉमिक्स ऍन्ड कॉमर्स फोरमतर्फे’ ‘केंद्रीय अर्थसंकल्प 2021-22 एक विश्लेषण’ या विषयावर शिवाजी विद्यापीठाचे ज्ये÷ अर्थतज्ञ प्रा. डॉ. पी. एस. कांबळे  यांचे  व्याख्यान होणार आहे. ज्योती महाविद्यालयात शनिवार दि. 6 रोजी सायंकाळी 4 वाजता होणाऱया या व्याख्यानावेळी अध्यक्ष म्हणून मंडळाचे उपाध्यक्ष ऍड. राजाभाऊ पाटील हे उपस्थित राहणार आहेत.

Advertisements

प्रमुख पाहुण्यांचा परिचय

प्रा. डॉ. प्रकाश   कांबळे यांचा पदवी आणि पदव्युत्तर अध्यापनाचा 32 वर्षांचा अनुभव आहे. पंधरा एम. फील विद्यार्थ्यांना व सतरा पी. एच. डी. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर एकूण 338 शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. तसेच  वृत्तपत्रातून 98 लेख आर्थिक घडामोडीवर प्रकाशित झालेले आहेत. त्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर 263 शोधनिबंधाचे वाचन केले आहे. 20 संदर्भ पुस्तके, 12 संपादित पुस्तके, अर्थशास्त्रीय पुस्तकात 10 लेख प्रकाशित झालेले आहेत.

जपानमध्ये 2015 साली झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत ‘सार्वजनिक आरोग्य’ या विषयावर शोधनिबंध सादर केला आहे. 2016 मध्ये मलेशिया या ठिकाणी झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत ‘शाश्वत विकास’ या विषयावर शोधनिबंध सादर केला आहे. या ठिकाणी उत्कृष्ट शोधनिबंध पुरस्कार मिळाला आहे. शैक्षणिक व संशोधन कार्याची पोच पाहून त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यामध्ये उत्कृष्ट शोधनिबंधासाठी धनंजय रा. गाडगीळ पुरस्कार प्रोफेसर व्ही. एन. दांडेकर पुरस्कार, शिवाजी विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी संघटनेकडून शिवगौरव पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तसेच यु. जी. सी. च्या आणि आय. सी. एस. एस. आर. च्या साहाय्याने दोन मेजर रिसर्च प्रोजेक्ट पूर्ण केले आहेत.

भारतीय अर्थशास्त्र संघटना, मराठी अर्थशास्त्र परिषद, आंतरराष्ट्रीय पर्यावरण अर्थशास्त्र संघटना, फुले, शाहू, आंबेडकर प्राध्यापक संघटना, भारतीय कामगार अर्थशास्त्र संघटना अशा विविध संघटनेचे ते आजीव सभासद आहेत. तसेच विविध महाविद्यालयाच्या अभ्यास मंडळावर सदस्य आहेत. शिवाजी विद्यापीठातील प्रशासकीय कमिटीचे अध्यक्ष आहेत. हे व्याख्यान सर्वांना खुले आहे, असे संस्थेचे सचिव विक्रम पाटील यांनी कळविले आहे. तरी सर्वांनी उपस्थित रहावे, असे कळविण्यात आले आहे.

Related Stories

जीवनरेखा हॉस्पिटलमध्ये आजपासून तिसऱया टप्प्यातील को-व्हॅक्सिनची चाचणी

Omkar B

क्वारंटाईन विभागासाठी मंडोळी ग्रामस्थांचा विरोध

Patil_p

अतिवाड गावची बससेवा सुरळीत करा

Amit Kulkarni

समतेसाठी गांधी-आंबेडकरी विचारांचा संगम व्हावा

Patil_p

पतीच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

Rohan_P

भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाल्यास तत्काळ राजीनामा देईन : मंत्री श्रीरामुलु

Shankar_P
error: Content is protected !!