तरुण भारत

बेळगाव-धारवाड मार्गाला मिळणार गती

रेल्वे अर्थसंकल्पात 50 कोटी रुपये मंजूर

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

बेळगाव-धारवाड व्हाया कित्तूर या रेल्वेमार्गाला आता गती मिळणार आहे. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पानंतर नैर्त्रुत्य रेल्वेने जाहीर केलेल्या ‘पिंक बुक’मध्ये बेळगाव-धारवाड मार्गासाठी 50 कोटी मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे या कामाला गती मिळण्याची शक्मयता निर्माण झाली आहे.

केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर झाल्यानंतर नैर्त्रुत्य रेल्वेने पिंक बुकच्या माध्यमातून नैर्त्रुत्य रेल्वे विभागात विकासकामांच्या निधी वाटपाबाबत अंदाजपत्रक जाहीर केले आहे. यामध्ये 3 हजार 245 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. तर राज्य सरकारकडून 1 हजार 223 कोटी रुपये रेल्वे विभागाला मिळणार आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यावषी 20 टक्के निधी वाढ करण्यात आला आहे.

मिरज-लोंढा विद्युतीकरणासाठी 80 कोटी मंजूर

पुणे ते लोंढा या दरम्यान रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण करण्यात येत आहे. मिरज ते लोंढा या 189 कि. मी. च्या विद्युतीकरणासाठी 80.14 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. अशी माहिती नैर्त्रुत्य रेल्वेचे व्यवस्थापक ए. के. सिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Related Stories

वनिता विद्यालयाच्या विद्यार्थिनींची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

Amit Kulkarni

बेळगावातही रेमडेसिवीरचा काळाबाजार उघड

Amit Kulkarni

जोंधळा खरेदी करण्यासाठी अतिरिक्त खरेदी केंदे

Amit Kulkarni

विधानपरिषदेत बोलून काय उपयोग?

Amit Kulkarni

कर्नाटक: कोरोना मृत्यू कमी करण्यावर लक्ष

Abhijeet Shinde

संजीव किशोर नैर्त्रुत्य रेल्वेचे नवे महाव्यवस्थापक

Patil_p
error: Content is protected !!