तरुण भारत

वनखात्याच्या समोरील रस्त्यावर वाहतूक कोंडी

शहरांतर्गत वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस जटिल : वाहनधारकांना नाहक त्रास

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत रस्ते, गटारी, डेनेजवाहिन्यांचा विकास साधण्यात येत आहे. रस्त्यांच्या कामासाठी काही रस्ते बंद तर काही रस्त्यांवर एकेरी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे शहरांतर्गत वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून शहरात स्मार्ट सिटीच्या कामामुळे वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

शहरातील बसस्थानक मार्गावर रस्त्याचे व गटारीचे काम सुरू आहे. शेट्टी गल्ली व चव्हाट गल्लीच्या प्रवेशद्वारावर खोदाई करण्यात आली आहे. त्यामुळे हा रस्ता बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. विकासासाठी रस्त्यावर टाकलेली माती, दगड यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन ठिकठिकाणी वाहनधारकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. शहरांतर्गत वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्याने वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस जटिल होत आहे.

शहरात बऱयाच ठिकाणी विकासकामे रखडली आहेत. याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर होत आहे. काही ठिकाणी काम पूर्ण झाल्यानंतर दगड, वाळूची उचल केली जात नाही. तर काही ठिकाणी कामे अर्धवट आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. अर्धवट असलेली कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी होत आहे.

Related Stories

बॅकांमध्येच जनधन खाते काढा

Patil_p

डॉक्टरांच्या दुर्लक्षपणामुळे सिव्हिलमध्ये महिलेचा मृत्यू

Amit Kulkarni

कॅन्टोन्मेंटची निवडणूक सहा महिने लांबणीवर पडण्याची शक्यता

Patil_p

केदनूर येथे गांजा विकणाऱया तिघा जणांना अटक

Patil_p

हलगाजवळ अपघातात चालक जखमी

Amit Kulkarni

मुख्यमंत्रीही क्वारंटाईन होण्याची शक्यता

Patil_p
error: Content is protected !!