तरुण भारत

202 व्यवसाय परवान्याचे सोळा दिवसांत वितरण

प्रतिनिधी / बेळगाव

शहरातील व्यापाऱयांकडे व्यवसाय परवाना नसल्याने महापालिकेने तपासणी मोहीम चालविली आहे. विविध ठिकाणी ही मोहीम राबवून दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याने व्यवसाय परवाना घेण्यासाठी महापालिकेकडे धाव घेतली आहे. शहरातील 202 व्यावसायिकांना व्यवसाय परवाना वितरित करण्यात आला असून, व्यवसाय परवान्याच्या माध्यमातून 16 दिवसांत 13 लाख रुपये महसूल जमा झाला आहे.

Advertisements

व्यवसाय परवाना न घेतल्याने महापालिकेने दंड वसुलीची मोहीम हाती घेतली आहे. बाजारपेठ आणि उपनगरातील व्यावसायिकांकडे परवान्याची विचारणा करण्यात येत आहे. बहुतांश व्यापाऱयांनी व्यवसाय परवाना घेतला नसल्याचे आढळून आले आहे. 4 हजारहून अधिक व्यावसायिकांनी व्यवसाय परवान्याचे नूतनीकरण केले नाही. त्यामुळे नूतनीकरण न केलेल्या व्यावसायिकांकडून दंड वसूल करण्यात येत आहे. व्यवसाय परवाना तपासणी मोहीम राबविण्यात येत असल्याने व्यावसायिकांनी व्यवसाय परवान्यासाठी महापालिकेकडे धाव घेतली आहे. सध्या व्यवसाय परवाना घेण्यासाठी संघटना पुढे येत आहेत.

मागील 16 दिवसांत 202 व्यावसायिकांना व्यवसाय परवाना वितरित केला आहे. तसेच व्यवसाय परवाना नूतनीकरण दंड व शुल्काच्या माध्यमातून 13 लाख रुपये महसूल जमा झाल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांनी दिली. ही मोहीम सातत राबवून परवाना घेणे सक्तीचे करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

Related Stories

काकती सिद्धेश्वर मंदिराला जाधव बंधूंची 2 लाख 11 हजारांची देणगी

Amit Kulkarni

अटलबिहारी वाजपेयी यांचे कार्य अविस्मरणीय – किरण जाधव

Patil_p

कर्नाटक: खासगी रुग्णालयांच्या वृत्तीबद्दल मुख्यमंत्र्यांचा संताप, कडक कारवाईचे दिले निर्देश

Abhijeet Shinde

शहर परिसरात अंगारकी संकष्टी उत्साहात

Amit Kulkarni

कोरोना हद्दपार होईपर्यंत मास्क वापरणे आवश्यक

Patil_p

भारतात हॉलमार्किंग कायदा लागू

Amit Kulkarni
error: Content is protected !!