तरुण भारत

कर्नाटकातील ४ हजार शेतकरी दिल्लीच्या सीमेवरील आंदोलनात सहभागी होणार

बेंगळूर/प्रतिनिधी

राजधानी दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्याच्या निषेर्धात सुरु आंदोलनात कर्नाटक (कर्नाटक) मधील शेतकरीही मोठ्या संख्येनेआंदोलनाच्या समर्थनार्थ सामील होणार आहेत. कर्नाटकातील शेतकरी संघटनेचे अध्यक्ष कोदीहळ्ळी चंद्रशेखर यांच्या नेतृत्वात कर्नाटकातील शेतकर्‍यांचे एक शिष्टमंडळ दिल्लीच्या बाहेर गाझीपूरच्या सीमेवर शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होत निषेध करणार आहेत.

चंद्रशेखर यांनी भारतीय शेतकरी संघटनेचे नेते राकेश टिकैत यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना संबोधित केले. त्यांनी निदर्शनास पूर्ण पाठिंबा दर्शविला आणि सांगितले की ६ फेब्रुवारीनंतर कर्नाटकातील सुमारे ४ हजार शेतकरी या निषेधात सामील होतील.

दरम्यान ६ फेब्रुवारी रोजी शेतकरी नेत्यांनी निदर्शनाची घोषणा केली. चंद्रशेखर यांनी कर्नाटकमधील शेतकरीही निषेध करतील आणि ६ फेब्रुवारीनंतर कर्नाटकमधील शेतकरी टिकरी, सिंघू आणि गाझीपूरमधील विविध ठिकाणी गटाने या आंदोलनात सामील होतील.

Advertisements

Related Stories

कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी उच्चस्तरीय समिती

Amit Kulkarni

नियमांचे उल्लंघन झाल्यास गुन्हा दाखल करा

Amit Kulkarni

कर्नाटकातील पाच जिल्ह्यांमध्ये कोविड सकारात्मकता दर २ टक्क्याहून अधिक

Abhijeet Shinde

बेंगळूरमध्ये आजपासून ड्रोनद्वारे सॅनिटायझिंग

Amit Kulkarni

देश पोलिओमुक्त करण्यासाठी सहकार्य करा : येडियुराप्पा

Amit Kulkarni

कर्नाटक: मंत्री सुरेश कुमार यांनी शाळांना दिल्या भेटी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!