तरुण भारत

कोल्हापूर : स्वच्छता गृहावर पन्हाळगड, राधानगरी धरणाच्या चित्राने संताप

महापालिकेचा कारभार : शिवशाहू भक्तांकडून निषेध, भिंतीला पुन्हा रंग देवून हटवले चित्र

प्रतिनिधी / कोल्हापूर

Advertisements

भवानी मंडप परिसरातील इंदूमती हायस्कूलजवळ असलेल्या सार्वजनिक स्वच्छता गृहाच्या भींतीवर पन्हाळगड आणि राधानगरी धरणाचे चित्र रेखाटण्यात आले. महापालिकेच्या या कारभाराबाबत माहिती मिळताच युवासेनेकडून याबाबत तीव्र संताप व्यक्त करत महापालिकेचा निषेध करण्यात आला. तसेच या भिंतीला पुन्हा पांढरा रंग देत हे चित्र हटविण्यात आले. पुन्हा असा प्रकार केल्यास तो खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा शिवशाहू भक्तांनी दिला.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धगधगत्या इतिहासाचा साक्षीदार असलेला ऐतिहासिक पन्हाळगड आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या दूरदृष्टीतून साकारलेले राधानगरी धरण कोल्हापूरच्या पर्यटन क्षेत्रातील महत्वाची ठिकाणे आहेत. हिंदवी स्वराज्याची प्रति राजधानी अशी पन्हाळ गडाची ओळख, तर उत्कृष्ट बांधकामाचा नमूना म्हणून राधानगरी धरणाकडे पाहिले जाते. त्यामुळे या दोन्ही वास्तुंना अनन्य साधारण असे महत्व आहे. मात्र या दोन्ही ऐतिहासिक वस्तु चक्क स्वच्छतागृहावर रेखाटण्याचा अजब कारभार महापालिका प्रशासनाने केला.

शनिवारी सकाळी हि बाब निदर्शनास येताच शिवशाहू भक्तांनी तत्काळ याठिकाणी धाव घेतली. चित्राबाबत चौकशी केली असता, महापालिकेनेच हे चित्र रेखाटल्याचे समोर आले. महापालिकेनेच केलेल्या या लाजीरवाण्या कृत्याबाबत आश्चर्य व्यक्त करत शिवशाहू भक्तांसह नागरिकांनी संताप व्यक्त केला. त्याच ठिकाणी लगेच आंदोलन करत महापालिकेच्या कृत्याचा निषेध केला. तसेच असा प्रकार पुन्हा केल्यास तो खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही शिवशाहूप्रेमींनी दिला. यावेळी हर्षल सुर्वे, आदित्य पवार, प्रदीप हांडे, चेतन आष्टेकर, अप्पा रेवडे, शुभम चौगुले, अर्जून कदम, महेश कोरवी, शरद चौगुले, युवराज हळदीकर, संकेत खोत, कृष्णात जगताप आदी उपस्थित होते.

Related Stories

पतीला किडनी देउन ती खऱ्या अर्थाने झाली अर्धांगिनी

Abhijeet Shinde

दरवाजे तोडून सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल लंपास

Abhijeet Shinde

गांधीनगर मेन रोडवरील अतिक्रमणांवर कारवाई

Abhijeet Shinde

कोल्हापूर : मंडळांना 4 फुटापर्यंत गणेशमूर्तींना परवानगी

Abhijeet Shinde

डोंगरी तालुक्यात औषधी वनस्पती प्रक्रिया संशोधन केंद्र सुरु करा

Abhijeet Shinde

बेळगावमधील शिवभक्त तरुणांवरील राजद्रोहाचे गुन्हे मागे घ्या

Sumit Tambekar
error: Content is protected !!