तरुण भारत

विद्युतीकरणानंतर रत्नागिरीत हवी लोकोशेड, डिझेल टँक!

– इंजिनच्या अदलाबदलीचा ‘रत्नागिरीवर’ ताण

  उदय बोडस/ रत्नागिरी

Advertisements

कोकणाची नवी जीवनवाहिनी कोकण रेल्वे येत्या महिन्यात आपले रूपडे पालटणार आह़े विद्युतीकरणाच्या योजनेच्या पहिल्या टप्प्याची चाचणी चालू आह़े रेल्वे बोर्डाकडून सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले की काही दिवसात पनवेल-रोहा-रत्नागिरी हा सुमारे 282 किमीचा मार्ग विद्युत इंजिनाने कापला जाणार आह़े त्यामुळे रत्नागिरीचे तांत्रिक महत्वही वाढणार आहे. यासाठी 2 नव्या सुविधांची गरज निर्माण होणार आहे.

 मध्य रेल्वे-कोकण रेल्वादक्षिण रेल्वे आणि पश्चिम रेल्वे यांच्या संयुक्त सहकार्याने धावणाऱया एकंदर 10 अप व 10 डाऊन गाडय़ा आता रत्नागिरीहून मंगलोरकडे जाताना डिझेल इंजिनवर व पुन्हा रत्नागिरीपर्यंत डिझेल इंजिनावर धावणार आहेत़ मात्र रत्नागिरीहून मुंबईच्या दिशेने होणारा प्रवास विद्युत इंजिनवर होणार आहे. म्हणजेच या 10 अप आणि 10 डाऊन गाडय़ांची इलेक्ट्रीक इंजिन्स रत्नागिरीत बदलावी लागणार आहेत़

 19 जानेवारी रोजी मध्यरेल्वेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकाप्रमाणे रत्नागिरीपर्यंत इलेक्ट्रीक इंजिनावर येणाऱया 10 पैकी 7 गाडय़ा रोज तर 3 गाडय़ा आठवडय़ातील 5 दिवस धावणार आहेत़ नवी दिल्ली-त्रिवेंद्रण राजधानी एक्सप्रेस आठवडय़ातून 3 दिवस पहाटे 3.05 व़ा रत्नागिरीत येणार आह़े दररोज पहाटे 3.40 व़ा मंगलोर एक्सप्रेस, त्यानंतर पहाटे 5.25 व़ा कोकणकन्या, तुतारी (सावंतवाडी) एक्सप्रेस सकाळी 3.20 व़ा., मंगला एक्सप्रेस सकाळी 11.15 व़ा गेली की डाऊन मांडवी 13.00 व़ा त्यानंतर नेत्रावती एक्सप्रेस 17.50 आणि मत्यगंधा एक्सप्रेस रात्री 21.05 व़ा येणाऱ  आठवडय़ात 2 दिवस रत्नागिरीत 13.25 व़ा येणार आहेत, त्या हजरत निझामुद्दीन-त्रिवेंदय या सुपरफास्ट गाडय़ा!

  मडगावहून रत्नागिरीपर्यंत डिझेलवर पुढील गाडय़ा येतील. मत्स्यगंधा एक्सप्रेस 0.25 व़ा, अप मंगला स. 7.35 व़ा., नेत्रावती एक्सप्रेस स. 9 व़ा व अप मांडवी दुपारी 14.00 व़ा मुंबईकडे जाणाऱ दरम्यान दुपारी 13.35 व़ा 3 दिवस त्रिवेंद्रम-दिल्ली राजधानी एक्सप्रेस रत्नागिरीत येणाऱ संध्याकाळी कोणतीच अप गाडी डिझेलवर येणार नाह़ी रात्री 10.00 व़ा तुतारी एक्सप्रेस व पाठोपाठ 22.15 व़ा मंगलोर-मुंबई एक्सप्रेस येणार व कोकणकन्या (अप) 22.55 व़ा येणाऱ मधेच आठवडय़ातून 2 दिवस त्रिवेंद्रम-हजरत निजामुद्दीन 21.05 व़ा येणार आहेत़

  या वेळापत्रकाचा विचार करता रत्नागिरी येथे किमान 3 आणि कमाल 5 इंजिने ही साधारणतः 2 तासाच्या ‘पिक पिरीयड’मध्ये बदलली जाणार आहेत़ सध्या रत्नागिरी स्टेशनवर 3 प्लॅटफॉर्म प्रवासी गाडय़ांसाठी व 1 मालगाडी क्रॉसींगसाठी वापरला जात़ो नवीन व्यवस्था लागू झाली की, यापैकी मुख्य मार्ग इंजिन बदलण्यासाठीच वापरता जाणार, असे दिसत आह़े  म्हणजे रत्नागिरीत आता मुख्य मार्गावर मालगाडीचे क्रॉसिंग अभावानेच असण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत रत्नागिरी स्थानकात लोकोशेड आणि डिझेल टँकची व्यवस्था क्रमप्राप्त वाटते. इलेक्ट्रीक व डिझेलची सरासरी 3 ते 5 इंजिने रत्नागिरीत राहणाऱ सध्या दादर [email protected] व दिवा [email protected] सुरू होण्याची शक्यता नाह़ी मध्यरेल्वेच्या पत्रकानुसार दादर [email protected] रत्नागिरी येथे डिझेल ‘लोको फिडींग ट्रेन’ म्हणून वापरली जाणार आह़े त्याची व्यवहार्यता अजून स्पष्ट झालेली नाह़ी

   रत्नागिरी येथे ज्या गाडय़ांची इलेक्ट्रीक इंजिन्स काढून डिझेल इंजिन लावणार त्यापैकी 9 गाडय़ा मडगाव किंवा तिथून पुढे जाणार आहेत़ त्या गाडय़ांना मडगाव येथे डिझेल भरता येणार आह़े पण मडगाव-रत्नागिरी व परत असे सुमारे 480 किमीसाठी आवश्यक डिझेल मडगाव येथूनच घ्यावे लागेल़ सध्या पनवेल-चिपळूण-मडगाव येथे डिझेल भरले जात़े त्यापैकी पनवेल-चिपळूण हे डिझेल स्टॉप या 9 गाडय़ांना मिळणार आहेत़ उरलेली तुतारी एक्सप्रेस फक्त रत्नागिरी-सावंतवाडी आणि परत सावंतवाडी-रत्नागिरी असे 322 किमी अंतर कापताना कोणताच डिझेल पॉइंट घेणार नाह़ी  त्यामुळे या इंजिनाचा प्रश्न कायमचा राहणार आह़े

  सध्या रत्नागिरी रेल्वे स्थानकाबाहेर इंडियन ऑईलची एक मोठी टाकी बसवली जात आह़े  पण रत्नागिरीतील RMV आणि ARMV meeþer लागणारे डिझेल चिपळूण येथूनच आणले जात़े दुसऱया भाषेत रत्नागिरीचे डिझेल आणायला रत्नागिरी-चिपळूण-रत्नागिरी असा 154 किमीचा प्रवास केला जात़ो तुतारीचे इंजिन रोज अशा प्रकारे धावणार की दादर [email protected] रोज डिझेल भरण्याची फेरी करणार, हे अनुत्तरित आहे. मध्य रेल्वेच्या प्रसिद्धीपत्रकात दहा गाडय़ांपैकी पनवेल-रत्नागिरी मार्गावर 7 आणि वसई-रत्नागिरी मार्गाला 3 गाडय़ा इलेक्ट्रीकवर धावल्यामुळे 80,84 किलो लिटर डिझेलची बचत होऊन 55.83 कोटी रूपये वाचणार आहेत़ रत्नागिरी-मडगाव मार्गाचे विद्युतीकरण जुलै 2021 पर्यंत अपेक्षित असताना जून 2021पर्यंत तुतारीच्या इंजिनाचे डिझेल रोज जाळण्यापेक्षा रत्नागिरीत डिझेल टॅंक कार्यान्वित करणे जास्त व्यवहार्य आह़े

  डिझेल-इलेक्ट्रीक इंजिनांची अदलाबदल करताना चालक-पालांची पण अदलाबदल होणार आह़े ही दोन्ही इंजिने चालवण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत़ यासाठी सरासरी 6 ते 10 चालक रत्नागिरीत कायमस्वरूपी उपलब्ध असावे लागतील. त्यांच्यासाठी आवश्यक सुविधा तसेच  3 ते 5 इंजिनांसाठी कायमस्वरूपी लोकोशेड रत्नागिरीमध्ये करण्याची गरज आह़े यामुळे रत्नागिरी स्थानकात कायम इंजिने दिसत राहणाऱ ‘बी केअर’ म्हणणाऱया कोकण रेल्वेने विद्युतीकरणानंतर आता ‘फिजीबिलीटी’ ऐवजी पॅसिलीटीचा विचार करत रत्नागिरी येथे लोकोशेड व डिझेल टॅंक द्यावी आणि आपले बोधवाक्य खरे करावे.

Related Stories

होम क्वारंटाईन’ वृद्धाचा दापोलीत मृत्यू

Patil_p

बँक खात्याची माहिती विचारून वृद्धाला 80 हजाराचा गंडा

Patil_p

कोकणातील सुपारी बागायतदार आर्थिक संकटात

Patil_p

रत्नागिरी : कोरोना संकटातील दिशाहीन तरूणांना सन्मार्गावर आणणार

Abhijeet Shinde

स्वदेशी बनावटीच्या डेमू ट्रेन’ नेपाळला सुपूर्द

Patil_p

कळंबणी येथे बस अपघात; 24 विद्यार्थी जखमी

Patil_p
error: Content is protected !!