तरुण भारत

पडवेतील मेडिकल कॉलेजचे आज उद्घाटन

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार उद्घाटन : देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांचीही उपस्थिती

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

पडवे येथील एस. एस. पी. एम. मेडिकल कॉलेजचे उद्घाटन 7 फेब्रुवारी रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, अन्य नेते तसेच राजकीय, उद्योग व वैद्यकीय क्षेत्रातील अन्य मान्यवर मंडळी उपस्थित रहाणार आहेत.

गेल्याच वषी संस्थेच्या सुपर स्पेशालिटी लाईफटाईम हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसेच अन् मान्यवरांच्या उपस्थित पर पडला होता.

नव्याने सुरू झालेले हे कॉलेज जिल्हय़ातील एकमेव आणि पहिले खासगी मेडिकल कॉलेज आहे. या कॉलेजमध्ये 150 जागा असून सर्वच्या सर्व जागा भरल्या आहेत. प्रथम वर्ष एमबीबीएससाठीचे ऍनॉटॉमी, फिजियोलॉजी आणि बायो केमिस्ट्री या तीन विषयांचे अभ्यास वर्ग सुरूही झाले आहेत.

तिन्ही वर्ग संपूर्ण वातानुकुलित आणि सुसज्ज आहेत, तर वाचनालयाची इमारतही स्वतंत्र आणि सुसज्ज असून ती संपूर्ण वातानुकुलित आहे. विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र उपाहारगृह असून त्यांची राहाण्याची व्यवस्था (हॉस्टेल) सुद्धा स्वतंत्र व वातानुकुलित इमारतीत करण्यात आली आहे.

प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये राज्यातील अनेक भागातील विद्यार्थ्यांचा समावेश असून हॉस्पिटलमधील अत्याधुनिक यंत्रसामुग्री, उपकरणे, तेथील स्वच्छता, अन्य सोयीसुविधा, मेडिकल कॉलेजमधील सुविधा बघून विद्यार्थी आणि पालक वर्गाने समाधान व्यक्त केले. हॉस्पिटलच्या आवारातील फळझाडे, फुलझाडे, हिरवळ तसेच आसपासचा निसर्गरम्य परिसर पाहून विद्यार्थी आणि पालकवर्ग तर अक्षरश: भारावून गेला.

हॉस्पिटलमध्ये ‘पेशंट’ची वाढती संख्या

गेल्या दोन महिन्यांत सुमारे 800 हून अधिक बेड असलेल्या या हॉस्पिटलमधील पेशंटची संख्या वाढत असून हृदयरोग, कर्करोग, किडनी, मेंदूचे आजार, कान, नाक, घसा शस्त्रक्रिया, दंत विभाग, ऑर्थोपेडिक आदी सर्वच विभाग आता पूर्णतः कार्यरत झाले आहेत. लहान मुलांचे आजार व उपचार याची व्यवस्था जिल्हय़ात याच हॉस्पिटलमध्ये आहे. अपघात विभाग, अतिदक्षता विभागातील अत्याधुनिक यंत्रसामग्री, डायलेसीस, सिटीस्कॅन, मॅमोग्राफी, सुसज्ज औषधालय, 24 तास रक्तपेढी व ऍम्ब्युलन्स या महत्वाच्या उपलब्ध सेवांमुळे पेशंटची संख्या वाढत आहे.

या भव्य हॉस्पिटलमध्ये एकूण 12 ऑपरेशन थिएटर असून लवकरच सुमारे 40 हून अधिक डॉक्टर 24 तास कार्यरत राहणार आहेत. हॉस्पिटल सुरू झाल्यापासून आजपर्यंत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत जिल्हय़ातील अनेक गरजू आणि गरीब पेशंटनी लाभ घेतला आहे.

संस्थेचे सर्वेसर्वा खासदार नारायण राणे, सौ. निलम राणे, आमदार नीतेश राणे, माजी खासदार नीलेश राणे हे वेळोवेळी हॉस्पिटलला भेट देऊन एकूण कारभारावर लक्ष ठेवून असतात. शिवाय सातत्याने माहिती घेत असतात. हॉस्पिटलमध्ये येणाऱया पेशंटच्या, त्यांच्या नातेवाइकांची तक्रार येऊ नये, यादृष्टीने ते प्रयत्नशील असतात. संपूर्ण हॉस्पिटल हे ‘सीसीटीव्ही’ कॅमेराच्या निगराणीखाली असून हॉस्पिटलचे डीन डॉ. आर. एस. कुलकर्णी आणि सी. ई. ओ. अपूर्वा पडते या एकूण कारभारावर बारीक लक्ष ठेवून असतात.

Related Stories

शिक्षकांची कोरोना तपासणी सुरू

NIKHIL_N

चाफवलीतील तरूणाच्या चित्रांचा सातासमुद्रापार डंका!

Patil_p

रत्नागिरीतील 1 एलईडीसह 2 पर्ससीन नौका श्रीवर्धनला पकडल्या

Patil_p

खेडमध्ये परिचारिकेसह ६ जणांना कोरोनाची लागण

triratna

मसुरे-मागवणे परिसरातील शेकडो एकर शेती पाण्याखाली

NIKHIL_N

बचतगटाद्वारे महिलांना स्वावलंबी बनवणार – आ. योगेश कदम

Shankar_P
error: Content is protected !!