चत्तोग्राम / वृत्तसंस्था
यजमान बांगलादेशने पहिल्या कसोटी सामन्यात विंडीजला विजयासाठी 395 धावांचे आव्हान दिले असून विंडीजने चौथ्या दिवसअखेर 3 बाद 110 धावांपर्यंत मजल मारली. पहिल्या डावात 430 धावांचा डोंगर रचल्यानंतर बांगलादेशने विंडीजचा पहिला डाव 259 धावांवर गुंडाळला. त्यानंतर त्यांनी आपला दुसरा डाव 8 बाद 223 धावांवर घोषित करत विंडीजला विजयासाठी 395 धावांचे आव्हान दिले. आता रविवारी सामन्याच्या शेवटच्या दिवशी विंडीजला आणखी 285 धावांची गरज असेल तर बांगलादेशसमोर 7 गडी बाद करण्याचे आव्हान असेल.