तरुण भारत

हिंडाल्कोजवळ बस चालकाला मारहाण

प्रतिनिधी/ बेळगाव

पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील हिंडाल्को जवळ परिवहन मंडळाच्या एका बस चालकाला मारहाण करण्यात आली आहे. शनिवारी दुपारी ही घटना घडली असून ट्रक आणि बस यांच्यात ओव्हरटेक करण्यावरुन ही घटना घडल्याचे सांगण्यात आले.

Advertisements

सुभाष चौगुला (वय 50) असे मारहाणीत किरकोळ जखमी झालेल्या बस चालकाचे नाव आहे. पुण्याहून कारवारला जाताना निपाणी जवळ ट्रक व बस यांच्यात ओव्हरटेक करण्यासाठी चढाओढ झाली. याच प्रकरणातून हिंडाल्को जवळ बस अडवून चालकाला मारहाण करण्यात आली आहे.

घटनेची माहिती मिळताच माळमारुती पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यासंबंधी शनिवारी रात्री माळमारुती पोलिसांशी संपर्क साधला असता एफआयआर दाखल झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मारहाणीच्या घटनेनंतर घटनास्थळी गर्दी जमली होती.

Related Stories

एकाचवेळी 135 गावांमध्ये रॅपिड ऍन्टिजेन टेस्ट

Amit Kulkarni

हिंडलग्यात चोरटय़ांचा धुमाकूळ

Patil_p

तुरमुरी-बाची गावच्या महिलांची ता. पं.ला धडक

Amit Kulkarni

मराठीच्या डिजिटल माध्यमाला स्वीकारा

Patil_p

पार्किंग शुल्कपेक्षा कर्मचाऱयांचा पगार अधिक

Patil_p

जुने बेळगाव येथे विद्यार्थ्याचा तलावात बुडून मृत्यू

Amit Kulkarni
error: Content is protected !!