तरुण भारत

नाबार्डकडून आरआयडीएफ अंतर्गत 15,500 कोटीचे वितरण

मुंबई

 राष्ट्रीय कृषी आणि ग्रामिण विकास बँक (नाबार्ड) यांच्याकडून ग्रामीण असंरचना विकास निधी (आरआयडीएफ) यांच्या अंतर्गत देशभरातील विविध ग्रामीण भागातील प्रकल्पांसाठी जवळपास 30,200 कोटी रुपयांच्या निधील मंजुरी दिली आहे. यामध्ये 16,500 कोटींची रक्कम वितरीत केली असल्याची माहिती आहे. आरआयडीएफची 1995 मध्ये स्थापना केली होती. ग्रामीण भारतामध्ये सामाजिक संपत्ती बनविण्यासाठी सदरचा निधी वितरीत केलेला आहे. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या 10 महिन्यांमध्ये नाबार्डने 30 हजार कोटींच्या स्वीकृत रक्कमेच्या तुलनेत 30,200 कोटी रुपयाच्या वितरणास मंजुरी दर्शवली आहे. अशी माहिती नाबार्डचे अध्यक्ष जी आर चिंतला यांनी दिली आहे. 31 जानेवारी 2021च्या आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्षामध्ये आतापर्यंत 16,500 कोटी रुपये इतका निधी वितरीत केलेला आहे. ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी आणि मजबुती प्राप्त करण्यासाठी नाबार्डचे कार्य सुरु असते. यामध्ये आपल्या स्थापनेनंतर आतापर्यंत नाबार्डने विविध ग्रामीण प्रकल्पांच्या उभारणीसाठी 3.11 लाख कोटी रुपयाचे वितरण केलेले आहे. हा निधी ग्रामीण क्षेत्रात  सकल भांडवल निर्मितीसाठी जवळपास 10 टक्क्यांचे योगदान हे नाबार्डचे असल्याचे यावेळी चिंतला यांनी स्पष्ट केले आहे.

Advertisements

Related Stories

गुगलची कार्यालये जुलैमध्ये सुरू

Patil_p

बाजारात सेन्सेक्स 374 अंकांनी मजबूत

Amit Kulkarni

सलग तिसऱया महिन्यात सेवा क्षेत्रात घसरण

Patil_p

आता गरज भक्कम आधाराची !

Omkar B

जगभरात बिटकॉईनची 27 हजारहून अधिक एटीएम

Amit Kulkarni

उत्पादनाचा खुलासा न केल्यास दंड आकारणी

Patil_p
error: Content is protected !!