तरुण भारत

उद्दिष्टपूर्तीसाठी रोज कोरोना लसीकरण

कोल्हापूर / कृष्णात पुरेकर


राज्यात सोमवार (8 फेब्रुवारी ) पासून कोरोना प्रतिबंधक लस रविवार वगळता सप्ताहातून 6 दिवस मिळणार आहे. लाभार्थ्यांच्या उद्दिष्टपुर्तीसाठी सोमवारपासून आणखी 3 लसीकरण केंद्रांची संख्या वाढणार आहे. सद्यस्थितीत राज्यातील आठ जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्यांची टक्केवारी तीसच्या खाली आहे. यामध्ये कोल्हापूर, सांगलीसह रत्नागिरी आहे. कमी टक्केवारी असलेल्या जिल्ह्यात टार्गेट पुर्तीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. लसीकरणात पंटलाईन वर्कर्सचा दुसरा टप्पा सुरू असून यामध्ये जास्तीत जास्त खासगी रूग्णालयांना सामावून घेण्याची सुचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत.

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला 16 जानेवारीला सुरूवात झाली. पहिल्या टप्प्यात डॉक्टर्स, परिचारिका, आशा स्वयंसेविकांना लस देण्यात आली. जिल्हा, उपजिल्हा, सेवा, ग्रामीण रूग्णालयात लसीकरण केंद्रे सुरू झाली. ग्रामीण भागात निवडक प्राथमिक आरोग्य केंद्रात लस दिली जात आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाशी निगडीत लसीकरण केंदांत कोरोना प्रतिबंधक लसीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न असलेल्या जिल्हा रूग्णालयांत लसीकरणाला अल्प प्रतिसाद मिळत आहे. त्याचा परिणाम जिल्ह्याच्या टक्केवारीवर झाल्याचे समोर आले आहे.

आरोग्य विभागाच्या वरिष्ठांच्या नुकत्याच झालेल्या उपसंचालक, शल्य चिकित्सकांशी ऑनलाईन झालेल्या बैठकीत यावर चर्चा झाली. चर्चेत रत्नागिरी, यवतमाळ, कोल्हापूर, पुणे, औरंगाबाद, बुलढाणा, परभणी आणि सांगली जिल्ह्यात लसीकरण टक्केवारी 30 पेक्षा कमी आहे. याची गंभीर दखल वरिष्ठांनी घेतली. चर्चेत त्यांनी लसीकरण केंद्रे वाढवण्यासोबत सप्ताहातून रविवार सुटी वगळता सहा दिवस लसे देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे दुसरा डोस येण्यापुर्वीच तीन टप्प्यांतील कोरोना योद्ध्यांना लसीकरण पूर्तीसाठी प्रयत्न सुरू आहेत.
कोल्हापुरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतर्गत `सीपीआर’मध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला अत्यल्प प्रतिसाद आहे. महापालिकांतर्गत नागरी केंदांवर लसीकरणाची टक्केवारी बरी आहे. ग्रामीण रूग्णालये, आरोग्य केंद्रांत प्रतिसाद वाढत आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या टक्केवारी शनिवारी तीसच्यावर पोहोचली आहे.

राज्यात 30 टक्क्यांखालील लसीकरणाची आकडेवारी

जिल्हा लाभार्थी लस घेतलेले लाभार्थी टक्केवारी
रत्नागिरी 15773 4579 29
यवतमाळ 17071 4910 29
कोल्हापूर 38529 10879 28
पुणे 119004 32401 27प्रतिबंधक
औरंगाबाद 40249 10584 26

परभणी आणि सांगली जिल्ह्याची टक्केवारी 25 इतकी आहे.
उद्दिष्टपुर्तीसाठी आणखी 3 लसीकरण केंद्रांची संख्या वाढणार,
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न जिल्हा रूग्णालयांतील टार्गेट वाढीसाठी प्रयत्न
शहरांतील खासगी हॉस्पिटल्समध्येही कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रे
राज्यातील 8 जिल्ह्यात लसीकरण टक्केवारी कमी
सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश

Advertisements

Related Stories

जिल्हा परिषद सभा : जिल्हाधिकारी, सीईओंच्या निषेधाचा ठराव

Sumit Tambekar

पुणे-मिरज-लोंढा विद्युतीकरण ७० टक्के पूर्ण

Abhijeet Shinde

एस टी संपात अश्रूंचा फुटला बांध…

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक निकाल: मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर विजयी

Abhijeet Shinde

रांगोळीतील दारू दुकानं बंदच करावीत – ग्रामस्थ

Abhijeet Shinde

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या

Abhijeet Shinde
error: Content is protected !!