तरुण भारत

मुंबई विद्यापीठ उपकेंद्राला धनंजय कीर यांच्या नावाचा प्रस्ताव

मंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषदेत माहिती

प्रतिनिधी/ रत्नागिरी

Advertisements

रत्नागिरी येथील मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राला रत्नागिरीचे सुपुत्र पद्मविभूषण धनंजय कीर यांचे नाव देण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्यात आल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिल़ी रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांमत यांनी ही माहिती दिल़ी

  रत्नागिरीचे सुपुत्र धनंजय कीर यांचे साहित्य व सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान आह़े यामुळे उपपेद्राला कीर यांचे नाव देण्याचा निर्णय आपल्या विभागाकडून घेण्यात येणार असल्याचे सामंत यांनी सांगितल़े तसेच रत्नागिरीतील बीएड महाविद्यालयासाठी रूसामधून 2 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आह़े या ठिकाणी स्पर्धा परीक्षा केंद्रही सुरू करणार आहोत़ तर येथील वसतीगृहाला मातोश्री वसतीगृह असे नाव देण्यात येणार असल्याचे सामंत यांनी सांगितल़े

कवी कालीदास उपकेंद्रही रत्नागिरीत उभारणार 

रत्नागिरी येथे अ†िभयांत्रिकी महाविद्यालयासाठी आपल्या विभागाकडून 10 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आह़े  तर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठासाठी 10 कोटी देण्यात येणार आहेत़ प्रशस्त अशा 1 एकर जागेत हे विद्यापीठाचे कार्यालय असणार आह़े तसेच कवी कालीदास उपकेंद्रही रत्नागिरीत उभारण्यात येणार आह़े यामध्ये प्राचीन भाषांचा अभ्यास विद्यार्थ्यांना करता येणार आह़े  यामध्ये कोकणातील भाषांचाही समावेश असेल़ पॉलिटेक्निकल स्टेट ऑफ एक्सलेन्स विभागासाठीही 25 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती सामंत यांनी यावेळी दिल़ी

              एखाद स्टेटमेंट करणे म्हणजे हद्दवाढ नव्हे

रत्नागिरी नगर परिषदेच्या हद्दवाढीसंदर्भात प्रसिद्धी माध्यमांसमोर एखाद स्टेटमेंट करणे म्हणजे हद्दवाढ नव्हे, असा टोला सामंत यानी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांना लगावल़ा जिल्हाधिकाऱयांनी सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंच सदस्यांशी चर्चा करून निर्णय घ्याव़ा बहुतेक ग्रामपंचायतींनी हद्दवाढीसाठी विरोध केला आह़े त्यामुळे ग्रामपंचायतींचा ठराव असल्याशिवाय हद्दवाढीचा निर्णय घेवू नये, असे सामंत यांनी सांगितल़े

Related Stories

नियतीसमोर थकलेल्या आईची कहाणी

NIKHIL_N

सिंधुदुर्गात नव्या शैक्षणिक विकासाची नांदी

NIKHIL_N

मुंबई-गोवा महामार्ग 20 तास ठप्प

Patil_p

सर्व अधिकाऱयांचे रिपोर्ट निगेटिव्ह

NIKHIL_N

राज्यात कोरोनाबाधित दोन हजार रुग्ण बरे होऊन घरी

Abhijeet Shinde

बांद्यात सोमवारी श्री विठोबाची जत्रा

Patil_p
error: Content is protected !!