तरुण भारत

देशविरोधकांनी भारतीय चहालाही सोडले नाही!

पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्लाबोल

गुवाहाटी / वृत्तसंस्था

Advertisements

देशाला बदनाम करण्यासाठी कारस्थान रचणारे एवढय़ा खालच्या पातळीपर्यंत पोहचले आहेत की, भारतीय चहाला देखील ते सोडत नाहीत. हे कारस्थान रचणारे योजनाबद्धरित्या भारतीय चहाच्या प्रतिमेला जगभरात बदनाम करत आहेत. परदेशात असलेल्या काही शक्ती चहाबरोबर भारताची जी ओळख जुडलेली आहे, त्यावर हल्ला करण्याच्या तयारीत आहेत, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आसाम येथील सभेत बोलताना केला.

आज जेव्हा मी आसामच्या चहा कामगारांबाबत बोलत आहे, तेव्हा आजकाल देशाविरोधात सुरू असलेल्या षड्यंत्राबाबत देखील बोलू इच्छित आहे. आज देशाला बदनाम करण्यासाठी कटकारस्थान करणारे, एवढय़ा पातळीपर्यंत पोहचले आहेत की भारताच्या चहाला देखील सोडत नाहीत. भारतीय चहाच्या प्रतिमेला बदनाम केले जात आहे. ज्यांनी भारतीय चहाला बदनाम करण्याचे काम हाती घेतले आहे व त्यांच्यासाठी इथे जे गप्प बसले आहेत, त्या सर्व राजकीय पक्षांना प्रत्येक चहा बागायतदार उत्तर मागेल. भारतीय चहा पिणारा प्रत्येक व्यक्ती उत्तर मागेल.’’ असा दावाही पंतप्रधानांनी यावेळी केला. तसेच “मी आसामच्या भूमीवरून या कारस्थानी लोकांना सांगू इच्छित आहे. त्यांनी हवी तेवढी कारस्थाने रचावीत मात्र देश यांच्या चुकीच्या योजना कधीही यशस्वी होऊ देणार नाही. माझा चहा कामगार ही लढाई जिंकूनच राहील. भारतीय चहावर केल्या जाणाऱया या हल्ल्यांमध्ये एवढी शक्ती नाही की ते आमच्या चहा बाग कामगारांचा सामना करू शकतील, असे पंतप्रधान म्हणाले.

आगामी काळात विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या आसाम आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दौरा करत आहेत. या दोन्ही राज्यांमध्ये पंतप्रधान मोदी अनेक योजनांचे भूमिपूजन करणार आहेत. पश्चिम बंगालमधील हल्दीया येथे ते एका सभेला संबोधित करणार आहेत.

प्रत्येक राज्यात मातृभाषेतून शिक्षण देणारे वैद्यकीय-तांत्रिक महाविद्यालय उभारणार

विकासाच्या मार्गावर असलेल्या ईशान्य भारतात आसामची भूमिका मध्यवर्ती आणि महत्त्वपूर्ण असल्याचा दावा पंतप्रधानांनी रविवारी केला. तसेच प्रत्येक राज्यामध्ये मातृभाषेत शिक्षण देणारे किमान एक वैद्यकीय आणि एक तांत्रिक महाविद्यालय असावे हे माझे स्वप्न आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. आसाममधील सोनितपूर जिह्यातील धेकियाजुली येथे पंतप्रधानांच्या हस्ते ‘असोम माला’ कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. आसामच्या आर्थिक प्रगतीत आणि दळणवळणामध्ये सुधारणा होण्यासाठी ‘असोम माला’ हा उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावेल, असेही त्यांनी सांगितले. आसाममध्ये भाजप सत्तेत आल्यास प्रादेशिक भाषांना अनुसरून महाविद्यालयांची पायाभरणी करु, असे आश्वासन पंतप्रधानांनी उपस्थितांना दिले. येथील विश्वनाथ आणि चराईदेवो येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या कोनशिलेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.

Related Stories

दहा वर्षानंतर गुजरातमध्ये आरोपी जेरबंद

Patil_p

विजयन, हासन यांनी भरला उमेदवारी अर्ज

Patil_p

नव्या बाधितांमध्ये घट झाल्याने दिलासा

Patil_p

माझ्या प्रवेशामुळे भाजपची बदलली प्रतिमा

Patil_p

मुख्यमंत्री येडियुराप्पा यांना समन्स

Patil_p

राज्यात पुराचं संकट त्यामुळे कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नये ; मुख्यमंत्र्यांचं आवाहन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!