तरुण भारत

विंडीजचे माजी क्रिकेटपटू मोसली यांचे अपघाती निधन

वृत्तसंस्था/ किंगस्टन

विंडीजचे माजी वेगवान गोलंदाज इझेरा मोसली येंचे वाहन दुर्घटनेत अपघाती निधन झाले. सायकलवरून जात असताना 63 वर्षीय मोसली यांना भरधाव मोटारीने जोराचा धक्का दिला. या अपघातात मोसली यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचे रूग्णालयात डॉक्टरी इलाज करण्यापूर्वीच निधन झाले.

Advertisements

मोसली यांनी आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकीर्दीत 1990 साली इंग्लंडविरूद्धच्या दोन कसोटीमध्ये विंडीज संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. त्यानंतर 1990 आणि 1991 या कालावधीत त्यांनी 9 वनडे सामन्यात विंडीज संघाकडून खेळ केला होता. क्रिकेट क्षेत्रातून निवृत्त झाल्यानंतर मोसली हे 2016 साली भारतात आयसीसीची टी-20 विश्वचषक महिलांची क्रिकेट स्पर्धा जिंकणाऱया विंडीज संघाचे साहाय्यक प्रशिक्षक होते.

Related Stories

सुशीलकुमार, पुजा धांडा यांच्या कराराचे नूतनीकरण अनिश्चित

Patil_p

भारत-नेपाळ मैत्रिपूर्ण लढत आज

Patil_p

स्टुटगार्ट स्पर्धेतून स्वायटेकची माघार

Patil_p

अंतिम फेरी गाठत अन्शू मलिकचा नवा इतिहास

Amit Kulkarni

महान बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांना कोरोनाची बाधा

Patil_p

ब्रिस्बेनमध्ये खेळण्यास भारताचा नकार नाही

Patil_p
error: Content is protected !!