तरुण भारत

फोटोंचा गैरवापर करुन निर्मात्याची बदनामी

प्रतिनिधी/ म्हसवड

माण तालुक्यातील एका चित्रपट निर्मात्याच्या चित्रपटातील शुटींगमधील फोटोंचा गैरवापर करत अनोळखी महिलेच्या फोटोशी फोटो जोडून फेसबुकवरील फेक अकौंटवरुन निर्मात्याची बदनामी केल्याप्रकरणी आकाशनंद अजितानंद जाधव (रा. दहिवडी, ता. माण) याच्यावर म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Advertisements

याबाबत चित्रपट निर्माते, दिग्दर्शक शशिकांत विठ्ठल डोईफोडे (वय 48, रा. पळशी, ता. माण) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार डोईफोडे हे दि. 30 मे 2017 ते 13 नोव्हेंबर 2019 या कालावधीत चित्रपट निर्मिती करत होते. चित्रपटाच्या शुटींगमधील काही फोटोंमधील फोटो शॉटचा गैरवापर करुन अश्लिलपणे दादा राठोड नावाच्या फेक अकाऊंटवर फोटो अपलोड करुन ते फोटो अनोळखी महिलेशी जोडले. हे सर्व फोटो सोशल मिडियावर आले.

हे कृत्य आकाशनंद जाधव याने केल्याची डोईफोडे यांची तक्रार असून यामुळे त्यांची बदनामी झाली. त्यातून त्यांना मानसिक त्रास झाला तसेच त्यांच्या हातून दोन नवीन सिनेमाची कामे गेल्याने त्यांना आर्थिक नुकसानही सहन करावे लागले आहे. या प्रकाराने जगणे मुश्किल झाल्याने त्यांनी दि. 6 रोजी तक्रार दिली. याप्रकरणी जाधव याच्यावर गुन्हा दाखल झाला असून दहिवडी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख याबाबत पुढील तपास करत आहेत.

Related Stories

दीपावलीनिमित्त किल्ले अजिंक्यतारावर गडपूजन उत्साहात

Abhijeet Shinde

सातारा पंचायत समिती सभापतींच्या केबिनची रंगरंगोटी

datta jadhav

दिलासादायक : महाराष्ट्रात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.4 %

Rohan_P

उत्तर रत्नागिरीत चक्रीवादळाने अतोनात नुकसान , पंचनामे सुरू

Abhijeet Shinde

वाढीव वीजबिला संदर्भात मनसेची पन्हाळ्यात निदर्शने

Abhijeet Shinde

”बडबड वीरांनी आता तरी आपली पोच ओळखून बाता माराव्यात”

Abhijeet Shinde
error: Content is protected !!