तरुण भारत

मूळ मुद्द्यांवर चर्चा झाली असती, तर चांगलं झालं असतं? : पंतप्रधान मोदी

ऑनलाईन टीम

दिल्ली सीमांवर गेल्या काही महिन्यांपासून कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन सुरू आहे. हे नवे कायदे रद्द करण्याची शेतकरी आणि विरोधकांकडून सातत्याने मागणी केली जात आहे. यावर शेतकरी आणि सरकारमध्ये अनेक बैठका झाल्या. मात्र या सर्व बैठकांमध्ये तोडगा न निघता त्या निष्फळ ठरल्या. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आजपर्यंत भाष्य केलं नव्हत. आज, राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी याप्रश्नी अखेर मौन सोडतं विरोधकांवर जोरदार हल्लाबोल चढवला. पंतप्रधानांनी कृषी मंत्र्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचा हवाला देत विरोधकांना प्रत्युत्तर दिलं.

“सभागृहात शेतकरी आंदोलनाची भरपूर चर्चा झाली. पण, मूळ मुद्द्यांवर चर्चा झाली असती, तर चांगलं झालं असतं. कृषीमंत्र्यांनी काही प्रश्न विचारले, त्या प्रश्नांची उत्तरं मिळणार नाहीत, याची मला खात्री आहे,” असा टोला मोदींनी यावेळी विरोधकांना लगावला.

देशासमोर अनेक आव्हानं आहेत. पण, समस्येचा भाग व्हायचं की, समाधानाचा? हे आपल्याला ठरवावं लागेल. जर समस्येचा भाग बनलो तर राजकारण होईल. समाधानाचा भाग झालो तर राष्ट्राच्या धोरणाला चार चाँद लागतील. समस्या आहेत, पण सोबत काम केलं तर निश्चित यश मिळवू,” असा विश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

“मी दैवेगोडा यांचा आभारी आहे. त्यांनी सरकारने केलेल्या कामाचं कौतुक केलं. त्याचबरोबर चांगल्या सूचनाही केल्या. शेतीची मूळ समस्या काय आहे? याबद्दल माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांनी जे सांगितलंय ते सांगू इच्छितो. बहुतांश शेतकरी असे ज्यांच्याकडे एक हेक्टरपेक्षा कमी जमीन, असे शेतकरी आता ६१ टक्के आहेत, ८६ टक्के शेतकऱ्यांकडे दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन, असे शेतकरी १२ कोटी आहेत. या शेतकऱ्यांची देशावर काही जबाबदारी नाही का?. त्याचं उत्तर आपल्याला शोधावं लागेल. निवडणुका आल्या की कर्जमाफीची योजना राबवतो. तो शेतकऱ्यांची योजना आहे की, मतं मिळवण्याचा हे सर्वजणांना माहिती आहे,” असं टीकास्त्र मोदींनी कर्जमाफी मुद्द्यावरून डागलं.

Related Stories

काश्मीरमध्ये नवीन दहशतवादी संघटना सक्रिय

datta jadhav

केरळमध्ये आढळला कोरोना विषाणूचा तिसरा रुग्ण

prashant_c

मेट्रोमॅन श्रीधरनना भाजपकडून उमेदवारी

Patil_p

अमरावती हिंसाचार प्रकरणी अनेक भाजप नेत्यांना अटक

Sumit Tambekar

राज्यातील कोरोनामुक्त क्षेत्रात शाळा सुरू करण्याबाबत शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सूचना जारी

Abhijeet Shinde

‘आयुष्यमान भारत’ चे ऑफिस सील, एकाला कोरोनाची लागण

prashant_c
error: Content is protected !!