तरुण भारत

सांगली : मनपा शाळेतील विद्यार्थ्यांनी बनविलेले उपग्रह अवकाशात झेपावले

तेलंगणा येथील रामेश्वर मधून झेपावले उपग्रह, पाच तासांच्या निर्धारित वेळेत पुन्हा जमिनीवर परतले

प्रतिनिधी / मिरज

Advertisements

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या शाळेतील दहा विद्यार्थ्यांनी तयार केलेले उपग्रह रामेश्वर तेलंगणा येथून अवकाशात झेपावले. यानंतर तीन ते पाच तासाच्या अंतराने निर्धारित वेळेत हे सॅटेलाईट पुन्हा पृथ्वीवर परतले. तेलंगणाच्या राज्यपाल श्रीमती तमिलीसाई सौदर्याराजन यांच्या हस्ते आणि इस्रोचे माजी संचालक डॉ. ए. शिवथानू पिलाई, मार्टिन चॅरिटेबल ट्रस्टच्या मॅनैमेजिंग ट्रस्टी डॉ. लिमा रोज मार्टीन व इस्रोचे संचालक पद्मश्री डॉ. मल्लयस्वामी अण्णादुराई यांच्या उपस्थितीत या उपग्रहाची यशस्वी चाचणी झाली. यावेळी फौंडेशनचे जनरल सेक्रेटरी मिलिंद चौधरी आणि राज्य समनव्यक मनिषा चौधरी उपस्थित होते.

रामेश्वर येथील डॉ. एपीजी अब्दूलकलाम आंतरराष्ट्रीय फौंडेशन रामेश्वर यांच्याकडून ‘पेलोड चॅलेंज 2021’ चे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात सांगलीसह देशभरातून विद्यार्थी सहभागी झाले होते. सांगली महापालिका शाळातील 10 विद्यार्थ्यांनी तयार केलेला उपग्रहसुद्धा मान्यवरांच्या हस्ते अवकाशात सोडण्यात आले. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले विद्यार्थी आणि शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

Related Stories

सुभाषनगरमध्ये पेट्रोल ओतून चारचाकी वाहने पेटविली,एकजण ताब्यात

Abhijeet Shinde

सांगली जिल्ह्यात दोन नवे रुग्ण; कुंडलवाडी येथील युवकास कोरोनाची लागण

Abhijeet Shinde

अखेर मिरजकरांना मिळाले शुद्ध पाणी

Abhijeet Shinde

पालकमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची केली पाहणी

Abhijeet Shinde

सांगली : माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार पाहणार खांजोडवाडीची डाळिंब

Abhijeet Shinde

राज्य सेवा पूर्व परीक्षा 14 मार्च रोजी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!