22 C
Belgaum
April 18, 2021
तरुण भारत

हिमाचल प्रदेश : दरीत कोसळली एचआरटीसी बस; 6 जण गंभीर जखमी

ऑनलाईन टीम / धर्मशाळा : 


धर्मशाळामधून पठाणकोट येथे जात असलेल्या हिमाचल रस्ते परिवहन निगमच्या बसला शहापूर मधील सिंहवामध्ये अपघात झाला आहे. या बसमधून 18 पेक्षा अधिक जण प्रवास करीत होते. या अपघातात यामधील 5 प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत. या सर्वांना शाहपुरमधील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर आणखी एका जखमी प्रवाश्यास टांडा मेडिकल कॉलेजमध्ये रेफर करण्यात आले आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, ट्रकला पास देत असताना मागून भरधाव वेगाने येत असलेल्या कारला वाचवण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला. वेगाने येणाऱ्या कार चालकाने कार कंट्रोल करण्यासाठी कार एका झाडावर धडकवण्याचा प्रयत्न केला मात्र कार वरील कंट्रोल सुटला आणि कार दरीत कोसळली. 


दरम्यान, शहापूर रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की, जखमी प्रवाशांच्या जीवाला कोणताही धोका नसून त्यांच्यावर अजूनही उपचार सुरू आहेत. 

Related Stories

डॉक्टर, पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा : अझरुद्दीन

prashant_c

देशात तुटवडा; अन् भाजप कार्यालयात 5 हजार ‘रेमडेसिवीर’चा साठा

datta jadhav

ब्रिटनच्या विमानांना 7 जानेवारीपर्यंत भारतात ‘नो एन्ट्री’

datta jadhav

1 जानेवारीपासून वाहनांना फास्टॅग अनिवार्य

Omkar B

अध्यक्षासंबंधी वेळच ठरविणार!

Patil_p

चीन-अमेरिकेदरम्यान ‘हवाई’ शीतयुद्ध

Patil_p
error: Content is protected !!