तरुण भारत

पेहरावातून समर्थन

नवाल्नींच्या पत्नीच्या समर्थनार्थ लाल टॉपमधील छायाचित्रे प्रसारित, फॅशन लेखिका कात्या फेडोरावांकडून नव्या ट्रेंडची सुरुवात

रशियातील महिला लाल रंगाच्या टॉपमधील स्वतःची छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रसारित करत आहेत. या छायाचित्रांच्या माध्यमातून त्या अलेक्सी नवाल्नी यांच्या पत्नी यूलिया यांना समर्थन दर्शवत आहेत. ‘आम्ही सर्व नवाल्नी आणि यूलिया यांच्यासोबत आहेत. पुतीन सरकार त्यांच्यावर अत्याचार करत असल्याचे’ या महिलांचे म्हणणे आहे. न्यायालयाने नवाल्नी यांना 3.5 वर्षांची शिक्षा ठोठावण्यादरम्यान यूलिया यांनी लाल रंगाचा टॉप परिधान केला होता.

Advertisements

नवाल्नी यांच्या समर्थनार्थ अशाप्रकारची छायाचित्रे प्रसारित करण्याचा ट्रेंड फॅशन लेखिका कात्या फेडोरोवा यांनी सुरू केला होता. त्यांनी रेड जंपरमधील स्वतःचे छायाचित्र पोस्ट करत युलिया यांच्या समर्थनार्थ लाल कपडे परिधान केले असून माझ्याप्रमाणे अन्य कुणी समर्थन देऊ इच्छित असल्यास या रंगाचा पेहराव करावा असे म्हटले हेते.

फेडोरोवा यांच्याकडून प्रेरणा घेत अनेक महिलांनी लाल कपडय़ांच्या पेहरावातील स्वतःची छायाचित्रे प्रसारित केली आहेत. ‘निराश होऊ नका, सर्व काही ठीक आहे’ अशी ओळही त्या छायाचित्रासोबत जोडत आहेत. पोलीस ताब्यात घेत असताना नवाल्नी यांनी यूलियाला उद्देशून हेच उद्गार काढले होते.

Related Stories

अमेरिकेत एच-1बी अन् ग्रीनकार्ड वितरण स्थगित

Patil_p

अमेरिकेत कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला 95 लाखांचा टप्पा

datta jadhav

काबूल विमानतळ स्फोट : इस्लामिक स्टेटने स्वीकारली जबाबदारी

Abhijeet Shinde

म्यानमारच्या सैन्यावर गंभीर आरोप

Patil_p

..अन् त्याने क्यूआर कोडचा टॅटूचं गोंदवला

Amit Kulkarni

कोरोना विषाणू नष्ट करणारी लस तयार

Patil_p
error: Content is protected !!