तरुण भारत

कोल्हापूर : 676 जणांची कोरोना तपासणी, नवे रूग्ण 3, कोरोनामुक्त 3

प्रतिनिधी / कोल्हापूर

जिल्ह्यात सोमवारी कोरोनाचे नवे 3 रूग्ण मिळून आले तर तिघे कोरोनामुक्त झाले. दिवसभरात 676 जणांची कोरोना तपासणी केल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली.

Advertisements

जिल्ह्यात सोमवारी कोरोना मृत्यूची नोंद निरंक राहिली. त्यामुळे कोरोना बळींची संख्या 1729 झाली आहे. ग्रामीण भागात 849, नगरपालिका क्षेत्रात 348, शहरात 377 तर अन्य 155 जणांचा समावेश आहे. दिवसभरात 3 नवे रूग्ण दिसून आले. तिघे कोरोनामुक्त झाले. सध्या 115 सक्रीय रूग्ण आहेत. दिवसभरात 676 जणांची तपासणी केली. त्यातील 100 जणांची अँटीजेन केली आहे. शेंडा पार्क येथील लॅबमधून सोमवारी 465 जणांचे रिपोर्ट आले.

त्यातील 454 निगेटिव्ह आहेत. ऍटिजेंन टेस्टचे 37 रिपोर्ट आले. ते सर्व निगेटिव्ह आहेत. ट्रुनेटचे 59 रिपोर्ट आले, त्यापैकी 56 निगेटिव्ह आहेत. गेल्या 24 तासांत आजरा 1, भुदरगड 0, चंदगड 0, गडहिंग्लज 0, गगनबावडा 0, हातकणंगले 0, कागल 0, करवीर 0, पन्हाळा 0, राधानगरी 0, शाहूवाडी 0, शिरोळ 0, नगरपालिका क्षेत्रात 0, कोल्हापूर शहर 1 व अन्य 1 असे 3 रूग्ण आहेत. नव्या 3 रूग्णांमुळे पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 50 हजार 011 झाली आहे, अशी माहिती डॉ. माळी यांनी दिली.

पॉझिटिव्ह रूग्ण 3, कोरोनामुक्त 3, कोरोना मृत्यू 0
आजपर्यतचे कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण ः 50 हजार 011
आजपर्यतचे कोरोनामुक्त रूग्ण ः 48 हजार 167
सध्या उपचार घेत असलेले कोरोना रूग्ण ः 115
आजपर्यतचे एकूण कोरोना बळी ः 1729
गेल्या 24 तासांत 676 संशयितांची तपासणी

Related Stories

कोल्हापूर, सांगलीचा पुराचा धोका टाळण्यासाठी फडणवीस, चंद्रकांत पाटील प्रयत्नशील: केशव उपाध्ये

Abhijeet Shinde

‘पीएम किसान’चे 1 कोटी 61 लाख होणार वसूल

Abhijeet Shinde

कोल्हापूर : कुपलेवाडीत डोंगराचे भूस्खलन झाल्याने पती-पत्नी ठार

Abhijeet Shinde

कोल्हापूर : कांतेचा आणखी दोन सराफांना तब्ब्ल ६४ लाखांचा गंडा

Abhijeet Shinde

गंगावेसच्या मल्लाने महाराष्ट्र केसरी पटकावल्यास त्याची हत्तीवरून मिरवणूक

Abhijeet Shinde

कोवाडच्या अभय पतसंस्थेतील 20 लाखांच्या चोरीचा छडा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!