तरुण भारत

माडबन समुद्र किनारी आढळली ऑलिव्ह रिडले कासवाची 88 अंडी

   जैतापूर  

राजापूर तालुक्यातील माडबन समुद्रकिनारी रविवारी पहाटे ऑलिव्ह रिडले जातीच्या समुद्री कासवाची 88 अंडी सापडली आहेत. माडबन येथील पर्यावरणप्रेमी व कासवमित्र शामसुंदर गवाणकर यांनी वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली ही अंडी सुरक्षित ठिकाणी संरक्षित करून ठेवली आहेत.

Advertisements

जागतिक स्तरावर गेल्या काही वर्षात समुद्री कासवांची संख्या झपाटय़ाने कमी होत चालली आहे. त्यामुळे दुर्मिळ होत चाललेल्या या प्रजातीच्या संवर्धनासाठी शासनाने, वनविभागाने गेल्या काही वर्षांपासून कासव संवर्धन मोहीम राबवली आहे. याद्वारे अनेक ठिकाणी स्थानिकांच्या मदतीने कासव संवर्धन केले जाते. माडबन समुद्र किनारी रविवारी 88 कासवाची अंडी सापडली आणि यामुळे माडबन किनारी पहिलं घरट झालं.

सर्वसाधारणपणे डिसेंबर-जानेवारी महिना हा कालावधी कासवांच्या प्रजननाचा असल्याचे मानले जाते. या काळात कासव अंडी देण्यासाठी महासागरातून सुरक्षित समुद्रकिनारी येत असतात. त्यामुळे थंडी सुरू झाली की कासवमित्रांना दररोज समुद्रकिनारी पाहणी करावी लागत असते. माडबन येथे शामसुंदर गवाणकर हे गेली सात वर्षे निरंतर हे कार्य करत आहेत, त्यामुळे त्यांना कासवमित्र असे संबोधले जाते. ते या अंडय़ाना सुरक्षित ठिकाणी संरक्षित करून त्यावर योग्य काळापर्यत नियमित देखरेख ठेवत असतात आणि त्यानंतर त्यातुन जन्म घेणाऱया पिल्लांना सुखरूप समुद्रात सोडत असतात.

आजवर त्यांनी हजारोच्या पटीत कासवांना समुद्रात सोडलं आहे. याकामी त्यांना सहकाऱयांची देखील मदत होते. वनविभाग व त्यासंबंधीचे अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गवाणकर गेली अनेक वर्षे हे कार्य करत आहेत. माडबन समुद्र किनारा हा समुद्री कासवांसाठी पसंतीचा असला तरी या वर्षी फेब्रुवारी महिना आला तरी अजूनही समुद्री कासवाची अंडी आढळली नव्हती. या काही महिन्यातील समुद्राच्या नैसर्गिक प्रतिकूल हालचाली यासाठी कारणीभूत असाव्यात असे गवाणकर यांना वाटते. दरवर्षी डिसेंबर मध्येच कासवाची अंडी सापडत असत त्यामुळे कासवमित्र गवाणकर यांना चिंता होती. मात्र आता समुद्री कासवांची पाऊले माडबन किनारी पडू लागली आहेत. ही अंडी वनअधिकारी घाटगे व गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली व नंदलाल गवाणकर याच्या सहाय्याने संरक्षित केली आहेत.  

Related Stories

कोविड अधिग्रहित खासगी रुग्णालयांचे दर जाहीर

NIKHIL_N

रत्नागिरीच्या बाजारात आला आफ्रिकन ‘मलावी हापूस’

triratna

स्वॅब कलेक्शन सेंटरमध्ये सुविधांची वानवा

NIKHIL_N

मुळगावात गावठी हातभट्टीच्या दारूधंद्यावर धाड

triratna

रत्नागिरी : खेडच्या पाणीटंचाईप्रश्नी आमदार योगेश कदम आक्रमक

triratna

संगमेश्वरात गारांचा पाऊस

Patil_p
error: Content is protected !!