तरुण भारत

कोलवात मशाच पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय

सीआयडीने केला पर्दाफाश,दोन संशयितांना अटक,पाच दिवसांची पोलीस कोठडी पाच युवतींची सुटका

प्रतिनिधी / पणजी

Advertisements

गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी (सीआयडी) कोलवा येथे केलेल्या कारवाईत, मशाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणाऱयांचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात दोन संशयितांना अटक केली असून पाट युवतींची सुटका केली आहे. संशयितांच्या विरोधात गुन्हा नोंद करून त्यांना रिमांडसाठी न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशयितामध्ये सुरज उर्फ समरोध शर्मा (32 शेल्डे केपे), संतोष सदू सोनावणे (32 कोलवा मुळ ठाणे येथील) यांचा समावेश आहे. सुटका केलेल्या पीडित युवतींची वैद्यकीय तपास केल्यानंतर युवतींना मेरशी येथील सुरक्षागृहात पाठविण्यात आले आहे.

कोलवा येथे मशाच पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती सीआयडी पोलिसांना मिळाली होती. वेश्या व्यावसायासाठी परप्रांतातून युवती आणल्या जात होत्या. त्यांना खोटी आमीशे दाखवून गोव्यात आणले जात होते नंतर त्यांना जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले जात होते. सीआयडी पोलिसांनी सुनियोजन करून कोलवा येथील आयुर मशाज पार्लवर धडक कारवाई केली व मशाच पार्लरचा पर्दाफाश केला आहे. दोन संशयितांना अटक करून पीडित युवतींची सुटका केली आहे. निरीक्षक लक्षी आमोणकर, सतीश गावडे, कॉन्स्टेबल भगवान पालयेकर, संकल्प नाईक होमगार्ड सुचीता वेळीप, परमीला वेळीप यांनी ही कारवाई केली आहे. साआयडीचे उपअधीक्षक सुनिता सावंत व अधीक्षक शोबीत सक्सेना यांच्या मार्गदर्शनाखाली सीआयडी पोलीस पुढील तपास करीत आहे.

Related Stories

मुस्लीमवाडा डिचोली येथील क्रॉस गटरची भर पावसात दुरूस्ती.

Omkar B

कोरोनाच्या कहरातही अवघा गोवाही राममय

Omkar B

धारबांदोडा, सावर्डे भाजपाने जिंकले

Patil_p

सरकारने जबाबदारीने वागावे

Amit Kulkarni

आरोग्य कर्मचारी प्रचंड तणावाखाली

Patil_p

पर्तगाळी मठात 30 रोजी गुरूपीठारोहण सोहळा 31 पासून चतुर्मास व्रताचरणाला प्रारंभ

Amit Kulkarni
error: Content is protected !!