तरुण भारत

बाळेपुंद्री खुर्द ग्रा.पं. अध्यक्षपदी रेणुका करवीनकोप्प

पद्मा कोला यांची उपाध्यक्षपदी निवड

वार्ताहर / बाळेकुंद्री

Advertisements

बाळेपुंद्री खुर्द येथे शुक्रवारी अत्यंत चुरशीच्या झालेल्या ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत अध्यक्षपदी श्रीमती रेणुका मल्लिकार्जुन करवीनकोप्प यांची  तर उपाध्यक्षपदी पद्मा कोंडय्या कोला यांची निवड झाली आहे.  निवडणूक दुपारी 12 वाजता ग्राम पंचायत कार्यालयात पार पडली. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून बेळगांवचे कृषी अधिकारी श्रीकांत गवी यानी काम पाहिले. ग्राम पंचायत कार्यालयात झालेल्या या निवडणुकीत महिला अ वर्गासाठी अध्यक्ष तर सामान्य महिलासाठी उपाध्यक्ष पद राखीव होते. निवडणूक अधिकारी  गवी यांनी निकाल जाहीर करताच कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करण्यात आली. यावेळी विजयी उमेदवारांनी  गावात  पदयात्रा काढून देवदेवतांना पुष्पहार अर्पण केले. नूतन अध्यक्षा रेणुका करवीनकोप्प म्हणाल्या, ग्राम पंचायतीच्या विकासांसाठी सर्वांनी एकत्रित येऊन सर्वांच्या सहकार्याने विकासकामांना प्राधान्य देण्यात येणार असून गावातील मूलभूत समस्यांचे निराकरन करण्यासाठी सर्व सदस्यांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे त्यानी याप्रसंगी सांगितले. युवक मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. विजयी उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी गावातील प्रमुख गल्लीतून गुलालाची व फटाक्याची आतषबाजी करत विजयोत्सव साजरा केला.

Related Stories

आई पॉझिटिव्ह, मुलगी निगेटिव्ह

Patil_p

भुतरामहट्टी प्राणीसंग्रहालयाकडे पर्यटकांची पाठ

Amit Kulkarni

बळ्ळारीमध्ये पोलिसांसाठी कोविड केअर सेंटर सुरू

triratna

बस बंद पडल्याने कॉलेज रोडवर वाहतूक कोंडीची समस्या

Amit Kulkarni

एलईडी बल्बची विक्री ठप्प का?

Patil_p

नरभक्षक बिबटय़ासोबतचे ते सहा दिवस….

Patil_p
error: Content is protected !!