तरुण भारत

गुलाम नबी आझादांचं कौतुक करताना पंतप्रधान मोदींना अश्रू अनावर

नवी दिल्ली/प्रतिनिधी

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्यासह राज्यसभेतील चार सदस्यांचा कार्यकाळ आज संपत आहे. चारही सदस्य जम्मू काश्मिरचं प्रतिनिधित्व करतात. या सदस्यांना सभागृहात निरोप देण्यात आला. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुलाम नबी आझाद यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. गुलाम नबी आझाद यांचं कौतुक करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले. दहशतवादी हल्ल्यानंतरची आझाद यांच्याबद्दलचा अनुभव सांगताना मोदींना अश्रू अनावर झाले.

राज्यसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुलाम नबी आझाद यांची क्षमता जम्मू काश्मीर आणि देशाच्या उपयोगी पडेल. मी अनेक वर्ष जम्मू काश्मीरमध्ये काम केलं. त्यावेळी स्कूटरवर फिरण्याची संधी मिळाली होती. गुलाम नबी आझाद यांच्यानंतर जे कुणी हे पद सांभाळेल त्यांना गुलाम नबी यांच्यासारखं राहताना अडचण येईल. कारण गुलाम नबी आझाद हे पक्षाबरोबरच देशाची आणि संसदेचीही काळजी करायचे. त्यांनी देशाला प्राधान्य दिलं. मी शरद पवार यांनाही याच श्रेणीत बघतो. मी एक बैठक घेत होतो. त्यावेळी त्यांनी फोन करून सांगितलं की, सर्व पक्षांच्या नेत्यांची बैठक घ्या. मी ती बैठक घेतली. २८ वर्षांचा कार्यकाळ हा खूप मोठा असतो,” असं मोदी म्हणाले.

Advertisements

Related Stories

ऑस्ट्रेलियात भीषण पूर, लाखो लोकांचे स्थलांतर

Patil_p

उद्यापासून राष्ट्रपती भवन सर्वसामान्यांसाठी बंद

datta jadhav

देशात 54,366 नवे कोरोना रुग्ण

datta jadhav

हरियाणात कोरोनाबाधितांची संख्या 9, 218 वर 

Rohan_P

आरोग्य, कृषी क्षेत्रांमधील सहकार्य वाढविणार

Patil_p

अखेर तिन्ही कृषी कायदे रद्द

Patil_p
error: Content is protected !!