तरुण भारत

ज्येष्ठ अभिनेते, निर्माते राजीव कपूर यांचे निधन

ऑनलाईन टीम / मुंबई : 


बॉलीवूड अभिनेते, निर्माते राजीव कपूर यांचे हृदय विकाराच्या धक्क्याने मुंबईत निधन झाले आहे. तेे  58 वर्षांचे होते. 

Advertisements


त्यांच्या राहत्या घरी दुपारी त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्यांना चेंबूर येथील रुग्णालयात त्यांना नेण्यात आले पण तेथे दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

रणधीर कपूर यांनी स्वतः भावाच्या निधनाबद्दल माहिती देताना सांगितले की, ‘आज मी माझा छोटा भाऊ राजीवला गमावले. डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले. पण त्याचे प्राण वाचवू शकले नाही. पुढील सर्व कामांसाठी आता मी इस्पितळातच आहे.’

ऋषी कपूर यांच्या पत्नी नीतू कपूर यांनी इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत राजीव कपूर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. दरम्यान, कपूर घराण्यातील वर्षभरातील हा दुसरा मृत्यू आहे. गतवर्षी 30 एप्रिल 2020 मध्ये ऋषी कपूर यांचे कॅन्सरने निधन झाले होते.

Related Stories

देशात कोरोना बाधितांची संख्या 78 हजार पार

pradnya p

राजस्थानमध्ये राजकीय उलथापालथीची शक्यता; सचिन पायलट 22 आमदारांसह दिल्लीत

datta jadhav

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांना कोरोनाची बाधा

pradnya p

पुणे विभागात 1 हजार 70 क्विंटल अन्नधान्याची आवक : डॉ.दीपक म्हैसेकर

prashant_c

राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी 36 कर्मचारी कोरोनाबाधित

pradnya p

छत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन

pradnya p
error: Content is protected !!