तरुण भारत

मुख्यमंत्र्यांच्या मुलीलाच ऑनलाईन गंडा

केजरीवालांच्या कन्येचे 34 हजार लंपास

नवी दिल्ली

Advertisements

 दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मुलीसोबत सायबर फसवणूक झाली आहे. आरोपींनी तिला 34 हजार रुपयांचा गंडा घातला आहे. केजरीवालांची मुलगी हर्षिताने एका संकेतस्थळावर जुन्या सोफ्याची जाहिरात दिली होती. याप्रकरणी पोलिसांची सायबर शाखा तपास करत आहे. हर्षिताने याप्रकरणी रविवारी तक्रार नोंदविली होती. सोफा खरेदी करण्यासाठी एका युवकाने तिच्याशी ऑनलाईन संपर्क साधला होता. त्याने हर्षिताच्या खात्यात प्रथम 2 हजार रुपये भरले. त्यानंतर आरोपीने पीडितेला एक क्यूआर कोड पाठविला, जो स्कॅन केल्यावर रक्कम खात्यात जमा होणार असल्याचे कळविले. हर्षिताने असे केल्यावर तिच्या खात्यातून 1000 रुपये वजा झाले. यासंबंधी हर्षिताने विचारणा केली असता आरोपीने चुकीचा कोड पाठविल्याचे आणि नवा कोड पाठविल्याचे सांगितले. पण नवा क्यूआर कोड स्कॅन केल्यावर हर्षिताच्या खात्यातील 33 हजार रुपयांची रक्कम वजा झाली होती.

मुख्यमंत्र्यांच्या मुलीसोबतच हा प्रकार घडल्याने पोलीस अधिकारी यावर अधिक बोलणे टाळत आहेत. यापूर्वी दिल्ली पोलीस दलातील संयुक्त आयुक्तांनाही ऑनलाईन फसवणुकीचा फटका बसला आहे.

Related Stories

हबीबगंज रेल्वे स्टेशनला अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव द्या

datta jadhav

दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात 1 जुलैपासून सुरू होणार ओपीडी सेवा

Rohan_P

उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वडिलांचे निधन

prashant_c

सुपरसॉनिक मिसाईल असिस्टेड टॉर्पेडोची यशस्वी चाचणी

datta jadhav

येत्या वर्षभरात सर्व टोलनाके हटवणार ; GPS यंत्रणा बसविणार : नितीन गडकरी

Rohan_P

घातपाताचा कट उधळत पाच संशयितांना अटक

Patil_p
error: Content is protected !!