तरुण भारत

पंतप्रधान मोदी-बायडन यांच्यात चर्चा

सुरक्षा, भारत-प्रशांतीय क्षेत्र, पर्यावरण यांवर बोलणी 

@ नवी दिल्ली  / वृत्तसंस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडन यांच्यात सोमवारी रात्री उशीरा दूरध्वनीवरून चर्चा झाली आहे. दोन्ही नेत्यांनी सामरिक सुरक्षा, प्रशांत महासागरीय क्षेत्र आणि जागतिक पर्यावरण संरक्षण आदी क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढविण्यावर बोलणी केली, अशी माहिती पंतप्रधान मोदी यांनी ट्विटद्वारे दिली. बायडन अध्यक्ष झाल्यापासून दोन्ही नेत्यांमधील ही प्रथमच प्रत्यक्ष चर्चा होती.

‘आम्ही स्थानिक मुद्दे आणि समान प्राथमिकता यांवर चर्चा केली. तसेच पर्यावरण संरक्षण क्षेत्रात सहकार्य अधिक वाढविण्यासंबंधी बोलणी केली. नियमबद्ध जागतिक व्यवस्थेवर आमचे एकमत झाले. भारतीय प्रशांत क्षेत्रात सामरिक सुरक्षेवर अधिक सहकार्य करण्याचे ठरविण्यात आले’, असे ट्विटमध्ये स्पष्ट केले आहे.

गेल्या आठवडय़ात अमेरिकेचे विदेश व्यवहार मंत्री अँथोनी ब्लिंकन यांनी चीनच्या विदेश व्यवहार मंत्र्यांशी चर्चा केली होती. त्यांनी चीनला विस्तारवाद आवरण्याची सूचना केल्याचे बोलले जाते. चीनने आंतरराष्ट्रीय नियमबद्ध व्यवस्थेनुसार वागले पाहिजे, अशीही अमेरिकेची इच्छा आहे.

अमेरिकेच्या प्रशासनाने काही दिवसांपूर्वी भारताच्या नव्या कृषी कायद्यांना पाठिंबा दिला होता. तसेच शांततापूर्ण आंदोलने हे भारताच्या जिवंत लोकशाहीचे लक्षण आहे, अशीही टिप्पणी केली होती. मात्र अमेरिकेच्या काही लोकप्रतिनिधींनी या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर ही चर्चा महत्त्वाची असल्याचे मत अनेक तज्ञांनी व्यक्त केले असून भारत आणि अमेरिका संबंध अधिक दृढ होतील अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.

Related Stories

मिथुन चक्रवर्ती निश्चित, गांगुलींबद्दल उत्सुकता

Patil_p

जेईई आजपासून, परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी कायम

Patil_p

ईशान्य भारतात 4 दिवसांत रुग्णसंख्या दुप्पट

Patil_p

निर्यात मार्चमध्ये 58 टक्क्यांनी वाढली

Patil_p

महागाईचा भडका : फेब्रुवारी महिन्यात तिसऱ्यांदा सिलेंडर दरात वाढ

pradnya p

देशात रुग्णसंख्येचा आलेख उंचावतोय

datta jadhav
error: Content is protected !!