तरुण भारत

सुनील दावरचा नवा राष्ट्रीय विक्रम

वृत्तसंस्था/ गौहाती

मध्यप्रदेशचा धावपटू सुनील दावरने राष्ट्रीय कनिष्ठांच्या ऍथलेटिक्स स्पर्धेत पुरूषांच्या 20 वर्षांखालील वयोगटात 5000 मी. धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदकासह नवा राष्ट्रीय विक्रम नोंदविला.

Advertisements

पुरूषांच्या 5000 मी. धावण्याच्या शर्यतीत सुनील दावरने 14 मिनिटे, 13.95 सेकंदाचा अवधी घेत नवा राष्ट्रीय विक्रम नोंदविताना 24 वर्षे अबाधित राहिलेला राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला. या क्रीडाप्रकारात 1996 साली सिडनीत झालेल्या विश्व कनिष्ठांच्या ऍथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या गोजेन सिंगने 14 मिनिटे, 14.48 सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम नोंदविला होता.

पाच दिवसांच्या या स्पर्धेतील तिसऱया दिवशी दिल्लीच्या हर्षिता शेरावतने महिलांच्या हातोडाफेकमध्ये नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवित सुवर्णपदक पटकाविले. तिने या क्रीडाप्रकारात 63.33 मी. हातोडाफेक केली. आंध्रप्रदेशच्या यशवंतकुमार लाव्हेटीने पुरूषांच्या 110 मी. अडथळा शर्यतीत सुवर्णपदक मिळविताना 13.92 सेकंदाचा अवधी घेतला.

Related Stories

युरो चषक स्पर्धेची बाद फेरी आजपासून

Amit Kulkarni

आयसीसीच्या पुढील बैठकीला जय शहा यांची उपस्थिती

Patil_p

महिलांच्या टेनिस हंगामाला 5 जानेवारीपासून प्रारंभ

Patil_p

ऑलिम्पिकमध्ये टी-10 क्रिकेट असावे : ख्रिस गेल

Patil_p

अचंता शरथ कमलचे खेलरत्नसाठी नामांकन

Patil_p

आनंदची पराभवाची मालिका अखंडित

Patil_p
error: Content is protected !!