तरुण भारत

एनसीसी छात्रांचा बेळगावमध्ये सत्कार

प्रतिनिधी / बेळगाव

एनसीसीच्या 26 कर्नाटक बटालियनतर्फे दिल्ली येथील प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा नुकताच बेळगाव येथे सत्कार करण्यात आला. जाधवनगर येथील एनसीसी कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला ग्रुप कमांडर कर्नल के श्रीनिवास उपस्थित होते.

Advertisements

कर्नाटक राज्यातील 71 हजार तर गोव्यातील 4 हजार छात्र एनसीसीचे प्रशिक्षण घेत आहेत. दरवषी मोठय़ा संख्येने एनसीसीचे छात्र दिल्ली येथे होणाऱया परेडसाठी निवडले जातात. परंतु यावषी 26 छात्रांनाच दिल्ली येथे जाता आले. यावेळी फिल्ड मार्शल करियप्पा ग्राऊंडवर रिपब्लिक डे कॅम्प घेण्यात आला. यामध्ये बेळगावमधील 5 छात्रांचा तर गोव्यातील 3 छात्रांचा समावेश होता.

दिल्ली येथून परत आल्यावर छात्रांचा बेंगळूर येथील विधानसौधमध्ये मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आल्याची माहिती या कार्यक्रमात देण्यात आली. कर्नल के. श्रीनिवास यांनी विद्यार्थ्यांना शिस्त व जिद्द या विषयी मार्गदर्शन केले.

Related Stories

शहापुरात मोबाईल चोरीच्या घटनांत वाढ

Patil_p

घरपट्टी चलन देण्यासाठी महसूल निरीक्षकांची लॉगईन आय सुरू

Patil_p

बाहेर फिरणाऱयांवर हवाई डोळय़ाची नजर

Patil_p

तालुक्यात भात रोप लागवड अंतिम टप्प्यात

Patil_p

टिळकवाडी संघटनेतर्फे आज सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार

Amit Kulkarni

गटार स्वच्छतेच्या नावाखाली धूळफेक

Patil_p
error: Content is protected !!