तरुण भारत

चौथे रेल्वेगेट येथे अडकताहेत वाहने

प्रतिनिधी / बेळगाव

चौथे रेल्वेगेट परिसरात रेल्वे विभागाच्यावतीने सोमवारी दुरुस्तीचे काम करण्यात आले. परंतु मुख्य रस्त्यावर खडी टाकण्यात आल्यामुळे यामध्ये मंगळवारी वाहने अडकत होती. यामुळे अडकलेल्या वाहनांना रेल्वे कर्मचारी व नागरिकांना धक्का द्यावा लागत होता. त्यामुळे या रेल्वे गेटवरील दुरुस्तीचे काम पूर्ण करून पेव्हर्स पुन्हा बसवावेत, अशी मागणी वाहनचालकांमधून करण्यात येत आहे.

Advertisements

अनगोळ येथील चौथे रेल्वेगेट येथे ट्रकची दुरुस्ती करण्यासाठी सोमवारी दिवसभर हे रेल्वेगेट बंद करण्यात आले होता. अत्याधुनिक मशीनरीच्या साहाय्याने ट्रकवर खडी घालण्यात आली आहे. त्याचसोबत ट्रकची काही ठिकाणी दुरुस्ती करण्यात आली. परंतु मुख्य रस्त्यावर पेव्हर्स काढून त्या ठिकाणी मोठी खडी घालण्यात आल्याने यामध्ये वाहने अडकली जात आहेत. मंगळवारी दुचाकी व चार चाकी वाहने यामध्ये अडकत होती. सकाळपासून उद्यमबाग येथे कामाला जाणाऱयांना याचा फटका बसला. त्यामुळे हा मार्ग पूर्ववत करण्याची मागणी वाहनचालक व नागरिक करीत आहेत.

Related Stories

आतापर्यंत जिल्हय़ातील 1 लाख जणांची तपासणी

Patil_p

लॉकडाऊन काळात पशुधनाची अविरत सेवा

Amit Kulkarni

सावगाव येथे बारा जुगाऱयांना अटक

Patil_p

ऐन भात कापणीच्यावेळी पाऊस पिकांचे नुकसान होण्याची शक्यता

Patil_p

निवडणुका झाल्या, आता लक्ष विशेष ग्रामसभांकडे

Amit Kulkarni

बी.एस.येडियुराप्पा मार्गावर बॅरिकेड्स

Amit Kulkarni
error: Content is protected !!