तरुण भारत

पोटनिवडणुकीसाठी आम्ही सज्ज

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी संजीवकुमार यांची माहिती : मतदारयाद्यांसंदर्भात घेतली अधिकाऱयांची बैठक : मतदारयाद्यांचे काम निरंतर

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

लोकसभेची पोटनिवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते. त्यासाठी निवडणूक आयोगाने सर्व ती तयारी पूर्ण केली असून या निवडणुकीसाठी आम्ही सज्ज आहोत. जिह्यामध्ये एकूण 38 लाख 57 हजार 982 मतदार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी संजीवकुमार यांनी सांगितले.

जिह्यातील मतदार याद्यांसंदर्भात आढावा घेण्यासाठी ते बेळगावात आले असता त्यांनी अधिकाऱयांची बैठक घेऊन संपूर्ण माहिती घेतली. याचबरोबर अधिकाऱयांना योग्य त्या सूचना केल्या. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 18 वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक व्यक्तीचे नाव मतदार यादीमध्ये नोंद करण्यासाठी निरंतर काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकसभा मतदान हे इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) यंत्राद्वारे होईल. मतदार याद्यांबाबत निवडणूक आयोगाने सर्व ती तयारी पूर्ण केली असून जे कोणी नाव दाखल करत आहेत त्यांची नावे तातडीने नोंद करून घेण्यात येत आहेत. निवडणूक काळात केवळ दहा दिवस हे काम थांबविण्यात येते. अन्यथा, इतर वेळी हे काम सुरू असते, असे त्यांनी स्पष्ट केले. आलेले अर्ज निकालात काढण्यात आले आहेत. केवळ 550 अर्ज शिल्लक असून त्यांची छाननी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोना रुग्ण-दिव्यांगांसाठी पोस्टलची सोय

कोरोना रुग्ण व दिव्यांग व्यक्तींनीही मतदानाचा हक्क बजावावा यासाठी त्यांना पोस्टल मतपत्रिका उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. केवळ नोकरदारांसाठीच नाही तर आता त्यांच्यासाठीही ही सेवा उपलब्ध करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. निवडणूक काळात कोरोना झाला तर कोरोना रुग्णांना पीपीई कीट उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याचबरोबर त्यांच्यासाठी स्वतंत्र विभाग व वेळदेखील ठरविण्यात येणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मोबाईलच्या माध्यमातून अर्ज दाखल करणे शक्मय

ज्या मतदारांना आपली नावे नोंदवायची आहेत त्यांनी ऑनलाईनद्वारे मतदार याद्यांमध्ये नोंदवू शकतात. त्यासाठी ऑनलाईनची सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. तेव्हा त्याचाही लाभ मतदारांनी घ्यावा, असे त्यांनी सांगितले. मोबाईलमधून हा अर्ज भरता येणार आहे.

या पत्रकार परिषदेवेळी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी, अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी उपस्थित होते.

Related Stories

कोविड वॉरियर-शेट्टी फौंडेशनच्यावतीने अनेक ठिकाणी गरजूंना मदत

Amit Kulkarni

डेंग्यूच्या संशयास्पद मृत्यूनंतर आरोग्य खाते खडबडून जागे

Patil_p

आरपीडी महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी

Amit Kulkarni

सिटी बसने घेतला विद्यार्थ्याचा बळी

Rohan_P

वडगाव येथील ज्ञानेश्वरी पारायण सोहळा 1 जानेवारी पासुन

Patil_p

खरीप हंगामापूर्वी शेतकऱयांना मार्गदर्शन करणे आवश्यक

Patil_p
error: Content is protected !!