तरुण भारत

जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या हस्ते ई-फेरफार सातबाऱ्याचे वाटप

ऑनलाईन टीम / पुणे : 


महसूल विभागाचे महाराजस्व अभियान हे महत्वाचे अभियान असून याअंतर्गत लोकाभिमुख प्रशासनाच्या संकल्पनेतून मंडळ स्तरावर दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी फेरफार अदालती घेऊन जनतेच्या प्रलंबित साध्या/वारस/तक्रारी नोंदी निर्गत करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. फेरफार अदालतीत नोंद करण्यात आलेल्या जनतेच्या प्रलंबित तक्रारी निर्गत करुन ई-फेरफार सातबाऱ्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या हस्तेवाटप करण्यात केले.

Advertisements


जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी फेरफार अदालतीच्या राजगुरुनगर, खेड आणि मंचर येथील मंडळ अधिकारी कार्यालयास प्रत्यक्ष भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. यावेळी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उप विभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण, सारंग कोडलकर, तहसीलदार वैशाली वाघमारे, रमा जोशी यांच्यासह संबंधित मंडळातील मंडळ अधिकारी, तलाठी, कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते.


डॉ. देशमुख म्हणाले, फेरफार अदालतीत जनतेच्या नोंदीत प्रलंबित तक्रारी तातडीने सुनावणी घेऊन निर्गत करा. या माध्यमातून शेतकऱ्यांना सेवा तात्काळ उपलब्ध करुन द्या. कामाचा वेग वाढवून प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करण्याच्या जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी सूचना दिल्या.


शासनाची योजना यशस्वी होण्यासाठी नागरीकांचा सहभाग खूप महत्त्वपूर्ण बाब आहे. त्यामुळे नागरिकांनी फेरफार अदालतीत जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी व्हावे. महसूल विभागाच्या समन्वयाने आपल्या गावातील इतर नागरिकांना याबाबत माहिती देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी देशमुख यांनी यावेळी केले. 

Related Stories

“भाजपची अवस्था म्हणजे, मी नाही त्यातली आणि…”, पिंपरी-चिंचवड पालिका भ्रष्टाचारावरून शिवसेनेचा खोचक टोला

Abhijeet Shinde

दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर 30 जूनपर्यंत बंदच

datta jadhav

पुणे विभागातील 5 लाख 2 हजार 222 रुग्ण कोरोनामुक्त!

Rohan_P

गोवा मद्य वाहतुक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तस्कराला अटक; 8 लाखाचा मुद्देमाल जप्त

Sumit Tambekar

पुणे विभागातील 1 लाख 70 हजार 431 रुग्ण कोरोनामुक्त

Rohan_P

मराठा आरक्षण : 10 तारखेच्या महाराष्ट्र बंदला पाठिंबा : प्रकाश आंबेडकर

Rohan_P
error: Content is protected !!