तरुण भारत

सोलापूर : काझी कुटूंबियांना ५० लाखाचा धनादेश सुपूर्त

प्रतिनिधी / करमाळा

करमाळा येथील मंडलाधिकारी अन्सार सय्यद काझी यांचे कोरोना कालावधीत त्यांचे कर्तव्य बजावत असताना, कोरोनामुळे त्यांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी सर्व स्तरातुन हळहळ व्यक्त केली गेली होती. शासन नियमांनुसार अधिकारी वर्गावर अवलंबून असलेल्या घरातील सदस्यांना ५० लाख रु. चा धनादेश देणे अधिकारी वर्गाने ही मान्य केले होते. 

आज माढा तालुक्यातील मोडनिंब येथे महाराजस्व अभियानांतर्गत “फेरफार अदालत” आयोजित करण्यात आली होती. ह्या कार्यक्रमामध्ये मृत मंडलाधिकारी अन्सार सय्यद यांचे वारस मुईज सय्यद यांना ५० लाख रु. चा धनादेश सुपूर्द करण्यात आला. हा धनादेश मुईज सय्यद यांना देतेवेळी सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, प्रांताधिकारी ज्योती कदम, तहसिलदार समीर माने, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुध्द कांबळे तसेच मंडलाधिकारी सादिक काझी इ. अधिकारी उपस्थित होते.

Advertisements

Related Stories

श्री संगमेश्‍वराच्या सान्निध्यात रंगली विकास आणि भाषेची चर्चा

Abhijeet Shinde

सोलापूर : विविध मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे ‘डफली बजाओ आंदोलन’

Abhijeet Shinde

हाथरस प्रकरण : पंढरपुरात राष्ट्रवादी युवतीचे बांगडी आंदोलन

Abhijeet Shinde

नक्षलवाद्यांशी लढताना पंढरपूरचे पोलीस उपनिरीक्षक गडचिरोलीत शहीद

Abhijeet Shinde

सोलापूर शहरात 36 कोरोना पॉझिटिव्ह तर 32 कोरोनामुक्त

Abhijeet Shinde

कार्तिकी वारी निर्बंधातच,दिंड्यांना पंढरपूरकडे जाण्यास मज्जाव

Abhijeet Shinde
error: Content is protected !!